शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

Corona Virus : पुणे जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत असणार ६२ हजार ६०० ॲक्टिव्ह रुग्ण : सौरभ राव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:00 AM

सध्या राज्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या पुणे जिल्ह्यात होत आहेत.

ठळक मुद्दे पुणे शहरात असणार ३६ ते ३८ हजार ॲक्टिव्ह रुग्ण  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले असून, मृत्यूदर देखील कमी

पुणे : सध्याचा रुग्ण वाढीचा दर लक्षात घेता ऑगस्ट अखेर पर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक लाखांपेक्षा अधिक असेल. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२ हजार ६२८ एवढी असेल असा अंदाज आरोग्य विभागाच्या वतीने व्यक्त केला आहे. यात पुणे शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६ ते ३८ हजारांच्या घरात असेल, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी येथे स्पष्ट केले. याबाबत राव यांनी सांगितले की, सध्या राज्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या पुणे जिल्ह्यात होत आहेत. गेल्या सात दिवसांत जिल्ह्यात तब्बल ७० हजार पेक्षा अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये शहराचा पाॅझिटिव्हीटी रेट सरासरी २२ टक्के एवढा असून, आयसीएमआरच्या निकषानुसार हा दर अधिक आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले असून, मृत्यूदर देखील कमी होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवू असा विश्वास राव यांनी व्यक्त केला. -----सध्या तरी कोरोना चाचण्या कमी करण्याचा विचार नाहीपुणे जिल्ह्यात सध्या राज्यातील सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्या जात आहे. मुंबई, दिल्लीत हळूहळू चाचण्यांचे प्रमाण कमी करत आहेत, पुण्यात देखील चाचण्या कमी करणार का या प्रश्नावर विभागीय आयुक्त राव यांनी सध्या पुण्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असताना दिसत आहे. परंतु पाॅझिटिव्हीटीचा रेट पाहिला असता २२ ते २५ टक्के म्हणजे खूपच अधिक आहे. आयसीएमआरच्या निकषानुसार हा पाॅझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांच्या खाली आणि मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर ही चाचण्याचे प्रमाण कमी करु शकतो. सध्या जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही, मात्र पुढील दहा दिवसांत काय रिझल्ट येतात हे पाहून निर्णय घेण्यात येईल असे देखील राव यांनी स्पष्ट केले. -----पुढील दहा दिवसांत बेडची संख्या ८०० पेक्षा अधिक वाढजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बेडची संख्या देखील वाढविण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसांत बेडची संख्येत ८२५ ने वाढ झाली असून, , पुढील दहा दिवसांत आणखी८०० -८५० बेड वाढविण्यात येतील. यात येत्या दोन दिवसांत ससून रुग्णालयात ३४० तर नवले हाॅस्पिटल मध्ये नवीन १५० ,ऑक्सिजन बेड वाढणार आहे. -----पुण्याला जम्बो फॅसिलिटीज आवश्यकच पुण्यात रुग्ण संख्या कमी होत असताना कोट्यवधी रुपये खर्च करून जम्बो फॅसिलिटीज निर्माण करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत राव यांनी सांगितले रुग्ण संख्या लक्षात घेता जब्मो हाॅस्पिटल निर्माण करणे गरजेचे आहे. भविष्यात पुन्हा उद्रेक झाला तर तयार असणे अत्यंत आवश्यक आहे, तसेच सध्या सर्वाधिक ताण खासगी हाॅस्पिटलवर असून, नागरिकांच्या अनेक तक्रारी देखील येतात. यामुळेच नागरिकांना खात्रीशीर व योग्य दरात उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी जम्बो फॅसिलिटीज आवश्यकच असल्याचे राव यांनी सांगितले. -----

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSaurabh Raoसौरभ रावPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकर