शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

Corona virus : पुणे महापालिकेचे ४८ कर्मचारी कोरोनाबाधित, ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 12:15 IST

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून पुणे महापालिकेने कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही केली सुरू

ठळक मुद्दे२४ कर्मचारी हे बरे झाले असून त्यांना सोडण्यात आले घरी

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या, पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांपैकी ४८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इतरांना कोरोनापासून वाचविताना, पालिकेतील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.     कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून पुणे महापालिकेने कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरू केली. महापालिकेची आरोग्य यंत्रणा दिवसरात्र कामाला लागली. शहरातील एकमेव असे व १०० वर्षे जुने असलेले संसर्गजन्य आजारावरील उपचारासाठी प्रसिध्द असलेले डॉ. नायडू हॉस्पिटल कोरोनाबाधितांच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज करण्यात आले. दरम्यान ९ मार्च रोजी पुण्यात पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आणि आज दोन महिन्यांमध्ये हा आकडा हजारातही गेला. या काळात कोरोनाला अटकाव करण्यासाठी पालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली़ कोरोनाबाधित रूग्ण आढळला की त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे, परिसर स्वच्छ करणे, माहिती गोळा करणे, संशयित व्यक्तींना क्वारंटाईन करणे, क्वारंटाईन सेंटर, आयसोलेशन सेंटरची देखभाल करणे आदी कामेही सुरू झाली.     ९ मार्चनंतर अवघ्या पंधरा दिवसात म्हणजेच २५ मार्चला तर संपुर्ण देशातच लॉकडाउन करण्यात आले. यावेळी शासन आदेशानुसार कार्यालयातील पाच टक्के उपस्थिती वगळता शहरातील स्वच्छता, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, अग्निशामक दल, हॉस्पीटल्स अशा प्रत्येक ठिकाणची महापालिकेची यंत्रणा पुर्णत: रस्त्यावर उतरविण्यात आली. परंतू, या काळात महापालिकेच्या ४८ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली.    पालिकेच्या सेवेत असलेल्या व कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये सर्वाधिक आकडा हा सफाई कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांच्यासोबत शिपाई, बिगारी, लिपिक, बहुद्देशीय कामगार, आरोग्य निरीक्षक, वाहन चालक, बालवाडी शिक्षिका आणि नर्सेसचाही यात समावेश आहे. यापैकी  ३७ कर्मचारी हे महापालिकेच्या कायम सेवेतील असून ११ कर्मचारी कंत्राटी आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ५ महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ सफाई कर्मचारी असून एक आया आहेत. उर्वरीत ४३ कर्मचाऱ्यांपैकी २४ कर्मचारी हे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे़ तर अद्यापही १९ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरcommissionerआयुक्त