Corona virus : 318 new corona patients in Pune city on Thursday; 205 patients were cured | Corona virus : पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे

Corona virus : पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे

ठळक मुद्देप्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २९४; आजारातून बरे झालेल्यांची संख्या ३ हजार २६४

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये ३१८ रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ८५१ झाली आहे. रुग्ण संख्या वाढली असली तरी बरे झालेल्या २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २९४ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १५० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
गुरुवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ३१८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २३६ तर खासगी रुग्णालयांमध्ये ७१ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १०१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
शहरात गुरूवारी १० मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २९३ झाली आहे. दिवसभरात एकूण २०५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १५७ रुग्ण, ससूनमधील ०७ तर  खासगी रुग्णालयांमधील ४१ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार २६४ झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर पोचले आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार २९५ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३१५ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४६ हजार ५८२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५७६, ससून रुग्णालयात १४४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५७४ रुग्ण उपचार घेत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus : 318 new corona patients in Pune city on Thursday; 205 patients were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.