Corona virus : पुणे शहरात बुधवारी ३१० कोरोनाबाधितांची वाढ ; ३५३ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 21:16 IST2021-01-20T21:16:25+5:302021-01-20T21:16:35+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार २५५ इतकी

Corona virus : पुणे शहरात बुधवारी ३१० कोरोनाबाधितांची वाढ ; ३५३ जण कोरोनामुक्त
पुणे : शहरात बुधवारी ३१० कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३५३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ८५२ संशयितांची तपासणी करण्यात आली़. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ८.४ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९३ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार २५५ इतकी आहेत. आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७२० इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ९ लाख ८९ हजार ३५६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८३ हजार ७८७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७६ हजार ८१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.