Corona virus : पुणे शहरात सोमवारी १८५ कोरोनाबाधितांची वाढ; आठवड्यातील सर्वात कमी रूग्णसंख्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 07:58 PM2020-11-30T19:58:33+5:302020-11-30T20:02:46+5:30

कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत आज साधारणत: दुप्पटीने म्हणजे ३५६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. 

Corona virus : 185 corona infestations increase in Pune on Monday; The lowest number of patients per week | Corona virus : पुणे शहरात सोमवारी १८५ कोरोनाबाधितांची वाढ; आठवड्यातील सर्वात कमी रूग्णसंख्या 

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १८५ कोरोनाबाधितांची वाढ; आठवड्यातील सर्वात कमी रूग्णसंख्या 

Next

पुणे : शहरात गेल्या आठवड्याची तुलना करता, सोमवारी केवळ १८५ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ८.६० टक्के इतकी आहे. कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत आज साधारणत: दुप्पटीने म्हणजे ३५६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. 

दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढेल असा अंदाज असताना, आजची कमी रूग्ण संख्याही सुखावह आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात २ हजार १४९ कोरोना संशयित रूग्णांची तपसणी करण्यात आली असून, यामध्य १८५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. 

सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४१६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २५३ जण व्हेंटिलेटरवर आहेत.  तर १ हजार २०१ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ३७० इतकी आहे. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यातील ५ जण पुण्याबाहेरील आहे. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ४६४ इतकी  झाली आहे. आजपर्यंत ८ लाख १९ हजार ३०१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ६९ हजार ९७९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६१ हजार १४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

==========================

Web Title: Corona virus : 185 corona infestations increase in Pune on Monday; The lowest number of patients per week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.