Corona virus : पुणे शहरात १८४ रुग्ण बरे होऊन गेले घरी; दिवसभरात १०६ रूग्णांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 09:16 PM2020-05-27T21:16:25+5:302020-05-27T21:17:04+5:30

शहरात तब्बल १७१ रुग्ण अत्यवस्थ तर ११ रूग्णांचा मृत्यू

Corona virus : 184 patients recovered in Pune; An increase of 106 patients in day | Corona virus : पुणे शहरात १८४ रुग्ण बरे होऊन गेले घरी; दिवसभरात १०६ रूग्णांची वाढ 

Corona virus : पुणे शहरात १८४ रुग्ण बरे होऊन गेले घरी; दिवसभरात १०६ रूग्णांची वाढ 

Next
ठळक मुद्देएकूण रुग्णसंख्या ५ हजार ५३३ ; आजारातून बरे झालेल्यांची संख्या ३ हजार ५९

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये १०६ रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ५३३ झाली आहे. बरे झालेल्या १८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार १९० आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १७१ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
बुधवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १०६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५७ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १२१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
शहरात बुधवारी ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २८४ झाली आहे. दिवसभरात एकूण १८४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १०८ रुग्ण, ससूनमधील १० तर  खासगी रुग्णालयांमधील ६६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार ५९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार १९० झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३६० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४५ हजार २६७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५३६, ससून रुग्णालयात १४६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Corona virus : 184 patients recovered in Pune; An increase of 106 patients in day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.