शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

Corona virus : पुणे शहरात वाढले १८२ नवीन रुग्ण; कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ हजार ४४७ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 10:37 PM

जिल्ह्यात 248 नवीन रूग्ण तर 10 रुग्णांचा मृत्यू  दिवसभरात एकूण १७० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे१८३ अत्यवस्थ तर ०९ रूग्णांचा मृत्यूकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३७०शहरात दिवसभरात एकूण १७० रुग्ण आजारातून झाले बरे

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये शुक्रवारी दिवसभरात १८२ रूग्णांची भर पडली असून रुग्णांचा एकूण आकडा ७ हजार ४४७ वर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १७० जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १८३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ४०२ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १८२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १४१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी ०९ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३७० झाली असून यामध्ये जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १७० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १२४ रुग्ण, ससूनमधील ०५ तर  खासगी रुग्णालयांमधील ४१ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ६७५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ४०२ झाली आहे.-------------जिल्ह्यात 248 नवीन रूग्ण तर 10 रुग्णांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात शुक्रवार (दि.5) रोजी एका दिवसांत 248 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली. तर 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 8 हजार 965 वर जाऊन पोहचली आहे.तर एकूण मृत्यू 401 झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि कॅन्टोनमेन्ट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. शुक्रवारी कॅन्टोनमेन्ट हद्दीत एकही नवीन रूग्ण सापडला नाही. तर ग्रामीण भागात देखील 11रुग्ण सापडले. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्ण वाढ मात्र सुरूच आहे. ----एकूण बाधित रूग्ण : 8965पुणे शहर : 7522पिंपरी चिंचवड : 675कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 768मृत्यु : 401

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर रामcommissionerआयुक्त