शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १७६ नवीन कोरोनाबाधित; दिवसभरात १५७ रुग्ण झाले ठणठणीत बरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 8:44 PM

एकूण कोरोनाग्रस्त रूग्ण संख्या ७ हजार २६५ वर

ठळक मुद्दे१७६ अत्यवस्थ तर ११ रूग्णांचा मृत्यूआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५०५

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये दिवसभरात १७६ रूग्णांची भर पडली असून रुग्णांचा एकूण आकडा ७ हजार २६५ वर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १५७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १७६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ३९९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गुरुवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १७६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १३, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ११० तर खासगी रुग्णालयांमध्ये ५३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात गुरूवारी ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३६१ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १५७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ११०२ रुग्ण, ससूनमधील १२ तर  खासगी रुग्णालयांमधील ४३ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५०५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ३९९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १४४१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५५ हजार १५० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १६५४, ससून रुग्णालयात १६३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १५७ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस