शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Corona virus : पुणे शहरात बुधवारी १५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, १४ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 12:43 IST

११३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

ठळक मुद्देबुधवारी एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी १६५ रूग्णांची प्रकृती गंभीर

पुणे : पुणे महापालिका क्षेत्रात बुधवारी १५२  कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून, ११३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान आज विविध रूग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या चौदा कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत २ हजार २३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या (विविध रूग्णालयात उपचार घेत असलेले रूग्ण) १ हजार ६५६ इतकी आहे. तर आत्तापर्यंत २२१ जणांचा मृत्यू झाला असून, एकाच दिवसात शहरात प्रथमच सर्वाधिक म्हणजे १४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रूग्णांपैकी ८ जण हे ससून रूग्णालयातील असून, उर्वरित रूग्ण हे ६ जण हे खाजगी रूग्णालयातील आहेत. बुधवारी एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी १६५ रूग्णांची प्रकृती गंभीर असून, यापैकी ४३ जण व्हेंटिलेटरवर आहेत.     आज नव्याने दाखल झालेल्या १५२ रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १९, नायडू व पालिकेच्या अन्य रूग्णालयामध्ये ८६ जण तर खाजगी रूग्णालयात ४७ जण उपचार घेत आहेत. तर आज १ हजार ५०७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौर