Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १४७९ नवे कोरोनाबाधित; ७७९ रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 01:32 IST2020-07-25T01:28:55+5:302020-07-25T01:32:48+5:30
विविध रुग्णालयात उपचार घेणारे तब्बल ६६३ जण अत्यवस्थ,२९ जणांचा मृत्यू

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १४७९ नवे कोरोनाबाधित; ७७९ रुग्ण झाले बरे
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शुक्रवारी १ हजार ४७९ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४५ हजार ५४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ८१७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ६६३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ६८६ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६६३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १०२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५६१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
दिवसभरात २९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ११३३ झाली आहे. दिवसभरात एकूण ८१७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २६ हजार ७२५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १७ हजार ६८६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ७४७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २ लाख ३५ हजार ५४५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.