Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले १४३ कोरोनाबाधित ; बरे झालेले ११९ रुग्ण गेले घरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 08:53 PM2020-06-09T20:53:06+5:302020-06-09T20:56:38+5:30

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १८९ जणांची प्रकृती चिंताजनक

Corona virus :143 corona-affected increased in Pune city during the day; 119 recovered patients went home | Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले १४३ कोरोनाबाधित ; बरे झालेले ११९ रुग्ण गेले घरी 

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले १४३ कोरोनाबाधित ; बरे झालेले ११९ रुग्ण गेले घरी 

Next
ठळक मुद्देएकूण १८९ रूग्ण अत्यवस्थ, दिवसभरात १२ जणांचा मृत्यूआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ३०४ कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४०३

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला असून मंगळवारी दिवसभरात १४३ रूग्णांची भर पडली. दिवसभरात बरे झालेल्या ११९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १८९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ४९८ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
मंगळवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १४३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६८ तर खासगी रुग्णालयांमध्ये ६७ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १८९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १५२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
शहरात मंगळवारी १२ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४०३ झाली आहे. दिवसभरात एकूण ११९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ७३ रुग्ण, ससूनमधील ११ तर  खासगी रुग्णालयांमधील ३५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ३०४ झाली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ४९८ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६९७ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६२ हजार ४९५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १७३२, ससून रुग्णालयात १४६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ६२० रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Corona virus :143 corona-affected increased in Pune city during the day; 119 recovered patients went home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.