शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १३३ तर पिंपरीत ११३ नवे कोरोनाबाधित 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 12:13 AM

पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४० हजार ६४१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपुणे शहरात १५३ तर पिंपरीत ११९ जण कोरोनामुक्तपुणे शहरात १ लाख ६१ हजार ८४४ जण पॉझिटिव्ह; यातील १ लाख ५१ हजार ८८९ कोरोनामुक्तपिंपरीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७ हजार ९९६; त्यापैकी ८४ हजार ७१० कोरोनामुक्त

पुणे : शहरात सोमवारी १३३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १५३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आज दिवसभरात १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यामध्ये २ जण पुण्याबाहेरील आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ५४६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ३२४ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार ४४३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.           पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४० हजार ६४१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ६१ हजार ८४४ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५१ हजार ८८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ६९६ इतकी आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार २५९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहरात १ हजार १७६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.          ----------------------------------पिंपरीत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ८४ हजार ७१० पिंपरी शहर परिसरामध्ये आज ११३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ११९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे शहरातील एक जणांचा बळी गेला आहे.शहर परिसरात कोरोना आलेख कमी होताना दिसून येत आहे. महापालिका परिसरांमध्ये विविध रुग्णालयांमध्ये १ हजार ७३८ जणांना दाखल करण्यात आले होते. दिवसभरामध्ये आज १ हजार ७४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची  संख्या ८४९ झाली आहे. शहर परिसरामध्ये दिवसभरामध्ये १७४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११९ जण कोरोनामुक्त झाले असून एकूण संख्या ८४ हजार ७१० झाली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७ हजार ९९६ झाली आहे. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या १५२९ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल