Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ९३८ नवे कोरोनाबाधित; ५९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 22:02 IST2020-09-11T22:00:43+5:302020-09-11T22:02:58+5:30
दिवसभरात १ हजार ५७३ कोरोनामुक्त

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ९३८ नवे कोरोनाबाधित; ५९ जणांचा मृत्यू
पुणे : शहरात शुक्रवारी १ हजार ९३८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, दिवसभरात १ हजार ५७३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ आज दिवभरात ५९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी २१ रूग्ण पुण्याबाहेरील होते़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेआठ वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१७ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४७० व्हेंटिलेटरवर, ४४७ आयसीयू मध्ये तर ३ हजार २६७ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू होते.
शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख १५ हजार ७७० झाली असून, आतापर्यंत ९६ हजार २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ७०६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ३९ झाली आहे़
आज दिवसभरात ६ हजार ५८८ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख २१ हजार २४९ इतकी झाली आहे.