Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार २४९ नव्या बाधितांची वाढ; ११६८ रुग्ण झाले कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 10:51 IST2020-08-08T10:50:57+5:302020-08-08T10:51:24+5:30
आतापर्यंत ४४ हजार ७७४ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले .

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार २४९ नव्या बाधितांची वाढ; ११६८ रुग्ण झाले कोरोनामुक्त
पुणे : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार २४९ कोरोनाबधितांची वाढ झाली असून, १ हजार १६८ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात रात्री आठ वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ७०३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४३९ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ३२२ रुग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत शहरात एकूण ६३ हजार २८६ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अॅक्टिव रूग्ण संख्या ही १७ हजार ३३ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ४४ हजार ७७४ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ४७९ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर ५ हजार ५९४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख ८ हजार ५२९ वर गेला आहे.
--------