Corona virus : 1 thousand 159 corona free in Pune city on Wednesday; Addition of 1 thousand 101 new patients | Corona virus : पुणे शहरात बुधवारी १ हजार १५९ झाले कोरोनामुक्त; १ हजार १०१ नव्या रुग्णांची वाढ

Corona virus : पुणे शहरात बुधवारी १ हजार १५९ झाले कोरोनामुक्त; १ हजार १०१ नव्या रुग्णांची वाढ

ठळक मुद्देआजपर्यंत शहरात एकूण ६० हजार ५९७ जण कोरोनाबाधित

पुणे : पुणे शहरात बुधवारी १ हजार १५९ कोरोनाबधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, दिवसभरात १ हजार १०१ रुग्णांची वाढ झाली आहे़. तर दिवसभरात २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ६७६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४२५ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर २ हजार २७३ रुग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. 

आजपर्यंत शहरात एकूण ६० हजार ५९७ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १६ हजार ७५८ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ४२ हजार ४१० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ४२९ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.        

-----------------------------------

दिवसभरात विविध केंद्रांवर ५ हजार ६९८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा २ लाख ९७ हजार ७३७ वर गेला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus : 1 thousand 159 corona free in Pune city on Wednesday; Addition of 1 thousand 101 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.