Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०१ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ५८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 20:45 IST2020-08-24T20:38:38+5:302020-08-24T20:45:27+5:30
१ हजार १८८ जण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०१ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ५८ जणांचा मृत्यू
पुणे : पुणे शहरात सोमवारी १ हजार १८८ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १ हजार १०१ कोरोनाबधितांची वाढ झाली आहे. आज दिवसभरात ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १३ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ८०२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते़ यापैकी ४८७ जण व्हेंटिलेटरवर आहेत़. तर २ हजार ६८४ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत शहरात एकूण ८४ हजार ४९६ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ६८६ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ६७ हजार ७७७ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात आत्तापर्यंत २ हजार ३३ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
-----------------------------------
दिवसभरात विविध केंद्रांवर ५ हजार १२९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ४ लाख ७ हजार ९२४ वर गेला आहे़
------