Corona Vaccine Pune : पुणे जिल्हा परिषदेला कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सीन लसींचे ५५ हजार डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 06:18 PM2021-05-04T18:18:52+5:302021-05-04T18:26:39+5:30

हवेली, बारामती, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्‍यासाठी सर्वाधिक डोस देण्यात आले आहे.

Corona Vaccine Pune: Pune Zilla Parishad receives 55,000 doses of Covishield and Covaxin vaccine | Corona Vaccine Pune : पुणे जिल्हा परिषदेला कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सीन लसींचे ५५ हजार डोस

Corona Vaccine Pune : पुणे जिल्हा परिषदेला कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सीन लसींचे ५५ हजार डोस

Next

पुणे : पुण्यात पहिल्या, आणि दुसऱ्या टप्प्यात जोरदार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. जवळपास जिल्ह्यात आत्तापर्यंत 20 लाखांवर लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे.मात्र गेल्या काही दिवसांत लसींचा साठा उपलब्ध झाला नसल्यामुळे लसीकरणाची मोहीम थंडावली आहे. मात्र आता पुणेजिल्हा परिषदेला मंगळवारी(दि.४) एकूण ५५ हजार कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसी उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेकडून हे डोस सर्व तालुक्‍यांना वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण केंद्र पुन्हा सुरू होणार आहे. त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यानाही ही लस मिळणार आहे. 

पुणे जिल्हयातील हवेली, बारामती, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्‍यासाठी सर्वाधिक डोस देण्यात आले आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून लसीचे डोसची कमतरता असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, दोन दिवसात लसीचे डोस मिळाले नसते तर जिल्ह्यातील बहुतांश केंद्र बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली असती. मात्र, मंगळवारी (दि. 4) कोव्हीशिल्ड लसीचे 40 हजार आणि कोव्हक्सीन लसीचे 15 हजार लसीचे डोस आले आहेत. त्यामुळे हा लसीचा तुटवडा भरून निघेल, तसेच बंद असलेले केंद्र पुन्हा सुरू होवून लसीकरणाचा वेग वाढविण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, येत्या 1 मे पासून 18 वर्षापुढील सर्वांना लस देण्यात येणास सुरवात झाली आहे. मात्र, लसीचा तुटवडा आणि मर्यादित केंद्र यामुळे नोंदणी केलेल्या।लाभार्थ्यांना टप्याटप्याने लस दिली जात आहे. सध्या कोव्हॅक्सीनचे 15 हजार डोस आल्यामुळे लसीकरणाला गती मिळण्यास मदत होईल.

तालुकानिहाय कोविशिल्ड लसीचे डोस वितरीत.
आंबेगाव - 2800, बारामती - 3500, भोर - 2000, दौंड - 2500, हवेली - 4000, इंदापूर - 3500 जुन्नर - 3500, खेड - 3500, मावळ - 3000, मुळशी - 3000, पुरंदर - 3000, शिरूर - 3500, वेल्हा - 500, पुणे कॅन्टोन्मेंट - 500, देहू कॅन्टोन्मेंट - 500, खडकी कॅन्टोन्मेंट - 700
(कोव्हक्सीनचे सर्व तालुक्यांना प्रत्येकी 1 हजार डोस वितरीत करण्यात आले. त्यामध्ये औंध जिल्हा रुग्णालयाला 2 हजार लसीचे डोस आले आहेत.

Web Title: Corona Vaccine Pune: Pune Zilla Parishad receives 55,000 doses of Covishield and Covaxin vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.