शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

Corona Vaccination : कोरोना प्रतिबंधक लसीचे 'कॉकटेल' नुकसानकारक नाही; प्रतिकारशक्ती तेवढीच वाढणार : वैद्यकीय तज्ज्ञांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 07:35 IST

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस वेगळ्या कंपनीचा आणि दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा घेतला तर काय होईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे....

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस वेगळ्या कंपनीचा आणि दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा घेतला तर काय होईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. केंद्र सरकारने पहिला डोस वेगळा आणि दुसरा वेगळा घेतला तरी त्याचा विपरित परिणाम होत नाही, असे स्पष्ट केले आहे. याबाबत पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा घेतला तरी हरकत नसल्याचे मत नोंदविले आहे. प्रतिकारशक्ती तेवढीच वाढणार असून ताप, कणकण, अंगदुखी, पुरळ येणे हे तात्कालिक परिणाम जाणवू शकतात. मात्र, कोणतेही त्याचे दूरगामी दुष्परिणाम होणार नसल्याचेही या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास १६ जानेवारी सुरुवात करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षांपुढील आणि १८ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यास परवानगी देण्यात आली. पुण्यात ज्या नागरिकांना ज्या कंपनीच्या लसीचा पहिला डोस दिला गेला आहे त्याच कंपनीचा दुसरा डोस देण्याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यात नागरिकांना लस खुली केली गेली तेव्हा पहिला डोस वेगळा आणि दुसरा डोस वेगळा दिला गेल्याचा प्रकार घडला होता. मात्र, हा एकच प्रकार घडला. ----लसीकरणाबाबत जागतिक पातळीवर मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकाच कंपनीचे दोन डोस दिल्यास अधिक फायदा होतो. मात्र, अनेक देशांमध्ये लसींचा तुटवडा आहे. एकाच कंपनीचे दोन डोस मिळत नाहीत. त्यामुळे काही देशांनी वेगवेगळया कंपन्यांच्या लसी देण्याचा प्रयोग केला. विशेषतः इंग्लंडमध्ये हा प्रयोग करण्यात आला. त्याचा परिणाम जवळपास सारखाच दिसून आला. प्रतिकार क्षमता ८० ते ९० टक्के तयार होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. ----दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी घेतल्यास त्याचे तात्पुरते परिणाम दिसू शकतात. ताप येणे, अंगदुखी, कणकण, अंगावर पुरळ येणे आदी सौम्य लक्षणे दिसू शकतात. एक-दोन दिवसांच्या आरामात ते बरे होतील. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे या तज्ज्ञानी सांगितले.-----'शॉर्टेज'मधून नव्हे तर संशोधनातून निष्कर्षसध्या लसींचा तुटवडा असल्याने वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस घेतले तरी चालणार आहेत असे सांगितले जात असल्याचा नागरिकांचा समज होऊ शकतो. मात्र, हा तुटवड्यावरचा उपाय नाही तर जागतिक पातळीवर झालेल्या संशोधनातून आलेला निष्कर्ष असल्याचे डॉ. नितीन अभ्यंकर यांनी सांगितले.-----शहरात आतापर्यंत झालेले लसीकरणवयोगट                  लक्ष्य        पहिला डोस।     दुसरा डोसआरोग्य कर्मचारी     ५६,०००।     ५९,८१२।       ४६,१३०फ्रंटलाईन वर्कर।      ५७,२६६।    ६९,१५२।       २५,२०६६० च्या पुढील ।       ---।          २,८१,३४२।    १,३०,६६७४५ ते ५९।               --- ।        २,९४,६३२।।    ५२,६९०१८ते ४४ ।।             ---।           ३५,७४४।       ०००एकूण।                    --- ।         ७,४०,६८२।    २,५४,६९३एकूण लसीकरण = ९, ९५, ३७५-----तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात? वेगवेगळ्या कंपनीचे दोन वेगळे डोस घेण्यास हरकत नाही. त्याची परिणामकारकता कमी होणार नाही. मात्र, तात्पुरते परिणाम दिसू शकतील. एक-दोन दिवस आराम केल्यास ते बरे होतील. मात्र, त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. त्याने नुकसान होणार नाही.- डॉ. अमित द्रविड, व्हायरॉलॉजिस्ट, नोबल हॉस्पिटल-----दोन वेगळे डोस देण्याबाबत जागतिक पातळीवर संशोधन सुरू आहे. वेगळे डोस घेतले तर अधिक पूरक आणि परिणामकारक प्रतिकारशक्ती येत असल्याचे संशोधनामधून समोर आले आहे. को-व्हॅकसिन आणि कोव्हीशिल्ड या लसी एकमेकांना पूरक आहेत. त्या घेतल्या तरी दुष्परिणाम होणार नाहीत. उलट अधिक चांगली प्रतिकारशक्ती येईल. त्यामुळे वेगळे डोस घेतले तरी हरकत नाही.- डॉ. नितीन अभ्यंकर, व्हायरोलॉजिस्ट, पुना हॉस्पिटल----शहरात दहा लाखांच्या घरात लसीकरण झाले आहे. आतपर्यंत एखाद-दुसरीच घटना वेगळे डोस दिले गेल्याची घडली असेल. मात्र, त्याचे दुष्परिणाम झालेले नाहीत. लसीकरणात गडबड होऊ नये म्हणून लसींच्या प्रकारानुसार केंद्र वेगळे ठेवले जातात.- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल