Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहरात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 19:27 IST2022-01-19T19:23:43+5:302022-01-19T19:27:11+5:30
पुणे शहरात दिवसभरात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला

Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहरात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण
पुणे: Pune Corona Update: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाचा (covid 19 cases in pune) प्रसार वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात पुण्यात ६ हजार ४४१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४ हजार ८५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात दिवसभरात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पुण्यातील ९ तर पुण्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. सध्या शहरात २५८ रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर ३९ आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर २८ रुग्ण आहेत. सध्या शहरात ३९ हजार ५८२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत पुण्यात एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ७६ हजार २६९ वर गेली आहे. शहरात आतापर्यंत ९ हजार १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंतचे एकूण डिस्चार्जची संख्या ५ लाख २७ हजार ५२६ वर गेली आहे. आज शहरात केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी.