शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

कोरोनाला तुम्ही पोलीस आहात हे ओळखता येत नाही! स्वत:ला आणि कुटुंबातील सदस्यांना जपा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 18:52 IST

कोरोनाला कुठलाही धर्म कळत नाही. स्वत:ला आणि कुटुंबातील सदस्यांना जपा... 

ठळक मुद्देपोलीस कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप स्वत:ला आणि कुटुंबातील सदस्यांना जपा...

पुणे : सर्वसामान्य पुणेकर नागरिकांसाठी सतत कार्यरत राहणाऱ्या पुणे पोलिसांच्या कुटुंबियांना पुणे पोलिसांनी मोठा दिलासा आहे. पोलीस वसाहतीत जाऊन तिथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. बाजारपेठेच्या तुलनेत अतिशय माफक दरात त्यांना या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोनाला कुठलाही धर्म कळत नाही. तुम्ही पोलीस आहात हे त्याला समजत नाही. तेव्हा सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन शहराचे सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलिसांना केले आहे. जीवनावश्यक सेवेचे किट वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे किट देताना एका कुटुंबातील 4 व्यक्तीना किमान 8 ते 10 दिवस पुरेल एवढे साहित्य त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. गव्हाचे पीठ (5किलो), तांदूळ (2किलो), तूर डाळ (1 किलो), तेल (1 लिटर), साखर (2 किलो), चहा पावडर, मीठ, मसाले याचा समावेश किटमध्ये आहे. बाजारभावापेक्षा नाममात्र दरात पोलिसांना हे किट उपलब्ध होणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून जीवणावश्यक वस्तूसाठी आवश्यक ती सबसिडी घेण्यात आली आहे. यामुळे त्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, ज्या पोलिसांना कामामुळे अत्यावश्यक सेवेची खरेदी करता येणं शक्य होत नाही त्यांच्याकरिता जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानिमित्ताने पोलीस कुटुंबातील सदस्यांना दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी शहरातील प्रत्येक पोलिसांना एक किलो कांदा एक किलो बटाटा याचे वाटप केले. पोलीस कुटुंबियांना त्याचे वाटप करण्यात आले. सबसिडी त्या अत्यावश्यक मालावर उपलब्ध करून घेतले. या वस्तूचे वाटप पोलीस लाईन मध्ये करण्यात आले आहे. पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी काळजी करू नये. त्यांना मदतीचा हात आणि सहकार्य करण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. 

* पोलिसांना देण्यात येणाऱ्या वस्तूंची किंमत काय ? यापेक्षा आपल्या घरातील कुणी सदस्य घराबाहेर पडणार नाही याची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. कुणाचे पती, कुणाची पत्नी, मुलगा, मुलगी घराबाहेर काम करत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या उद्देशाने पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाचा पूर्णत: बिमोड करायचा असल्यास आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. रवींद्र शिसवे (सहआयुक्त पुणे पोलीस)

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFamilyपरिवार