शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Corona Crisis : महावितरणची 'पॉवरफुल' कामगिरी ; राज्यात १० ऑक्सिजन प्रकल्प अन् ३५ कोविड सेंटरला 'सुपरफास्ट' वीजजोडणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 18:38 IST

ज्या कामांना इतरवेळी साधारणतः ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या २४ ते ४८ तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान ठिकठिकाणी रुग्णांच्या उपचारासाठी प्रचंड स्वरूपात ऑक्सिजनची मागणी असताना त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना वेग देण्यात आला आहे. महावितरणने एका महिन्याच्या कालावधीत राज्यातील १० मोठ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ३५ कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. 

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तसेच कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे ही अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर सज्ज राहण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिल्या आहेत.

ज्या कामांना इतर वेळी साधारणतः ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या २४ ते ४८ तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. यासाठी प्रशासकीय तसेच तांत्रिक सोपस्कार बाजूला ठेवत महावितरणकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली आहे. 

गेल्या महिन्याभरात तब्बल १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना महावितरणने अवघ्या ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची सेवा दिली आहे. एकूण १४ हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे.यामध्ये के चंद्रा इंजिनिअरींग वर्क्स (जेजूरी, जि. पुणे), ऑक्सीएअर नॅचरल रिसोर्सेस (रांजणगाव, जि. पुणे) या २० मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सीजन प्रकल्पांना केवळ ४८ तासांमध्ये ५२३ केव्हीए वीजभाराची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली. जेएसडब्लू (डोलवी, जि. रायगड) कंपनीला मागणीप्रमाणे दोन टप्प्यात १०९ एमव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार मंजूर करून कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच के नायट्रोक्सिजन (सातारा), सोना अलॉयज (लोणंद, जि. सातारा), मॉडर्न गॅस इंडस्ट्रिज (अंबरनाथ, जि. ठाणे), स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स (सिन्नर, जि. नाशिक), अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस (अहमदनगर), लिंडे इंडिया (पनवेल, वाशी) कंपनीचा समावेश आहे. 

यासोबतच गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्याची कामे महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. आतापर्यंत राज्यातील ३५ कोविड रुग्णालयांना २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

जळगाव- ११, अहमदनगर- ६, पुणे व नंदुरबार जिल्हा- प्रत्येकी ४, नाशिक, ठाणे व नागपूर- प्रत्येकी २, धुळे, औरंगाबाद, पालघर जिल्हा – प्रत्येकी एक आणि मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एक अशा एकूण ३५  कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकारNitin Rautनितीन राऊतPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन