शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 09:18 IST

Pune Porsche Car Accidentदोन्ही पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीस मनाई असल्याचा फलकही लावला नसल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात उघड

Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर येथील पाेर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलासह मित्रांचे पार्टीसाठी बुकिंग घेत पबचालकांनी त्यांच्या वयाची खातरजमा न करता मद्य पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना जामीन झाल्यास पुराव्यात छेडछाड करून तपासात अडथळा आणण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद करत सरकार पक्षाने सोमवारी (दि. १०) विशाल अग्रवाल याच्यासह पबमालक व कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. जामिनावर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, त्यावर २१ जून रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) आणि अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याप्रकरणी ‘कोझी’ पबच्या मालकाचा मुलगा नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्मविलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर) आणि ‘ब्लॅक’ पबचा सहायक व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाइट्स, मुंढवा), बार काऊंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) आणि कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय ३४, रा. एनआयबीएम) यांनी जामिनावर मुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे.बचाव पक्षातर्फे ॲड. एस. के. जैन, ॲड. सुधीर शहा, ॲड. अमोल डांगे आणि ॲड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, आरोपींनी तपासात पूर्णपणे सहकार्य केले आहे. आरोपींवरील कलमे अदखलपात्र असून, त्यांना जामीन देण्यात यावा, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. त्याला विशेष सरकारी वकील विद्या विभुते व तपास अधिकारी गणेश माने यांनी विरोध केला.

गुन्हा घडल्यावर विशाल अग्रवाल फरार झाला होता, त्याने घरातील सीसीटीव्ही चित्रीकरणात छेडछाड केली आहे, तसेच मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केला असून, गुन्हा अंगावर घेण्यासाठी चालकावर दबाव आणला आहे, तर अपघाताच्या घटनेपूर्वी आरोपी पबचालकांनी अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याचे तपासात निदर्शनात आले असून, या दोन्ही पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीस मनाई असल्याचा फलकही लावला नसल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात उघड झाले आहे. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला.

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिसliquor banदारूबंदीCourtन्यायालयadvocateवकिल