शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याच्या अखेर वाद मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 3:34 PM

संध्या केशे आणि प्रणिकेत खुणे यांनी या वादाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांपासून 'कॉपीराईट’च्या मुद्यावरून त्रिकूटामध्ये वादाची ठिणगी पडली होतीप्रणिकेत खुणे, संध्या केशे आणि उमेश गवळी यांच्यात गाण्याच्या कॉपीराईटवरून वाद झाला होता

पुणे: 'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली होती. या गाण्यामुळे गायक उमेश गवळी, संगीतकार प्रणिकेत खुळे आणि निर्मात्या संध्या केशे हे त्रिकूट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून 'कॉपीराईट’च्या मुद्यावरून त्रिकूटामध्ये वादाची ठिणगी पडली अन् हा वाद इतका विकोपाला गेला की थेट हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एकत्रित प्रयत्नामुळे महामंडळाच्या लवादासमोर मिटला.

प्रणिकेत खुणे, संध्या केशे आणि उमेश गवळी यांच्यात गाण्याच्या कॉपीराईटवरून वाद झाला होता. हे गाणे यूट़्यबवरून काढून टाकल्यामुळे या तिघांचेही मोठे आर्थिक नुकसान होत होते. यामुळे संध्या केशे आणि प्रणिकेत खुणे यांनी या वादाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांकडे धाव घेतली होती. मनसेचे रमेश परदेशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या माध्यमातून महामंडळाच्या लवादासमोर हा वाद चर्चेने सोडविण्यात आला.

उमेश गवळी म्हणाले, मागील काही दिवसांपासून आमच्या तिघांमध्ये संवाद नव्हता. त्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण होऊन परस्परांविषयी चूकीची वक्तव्ये केली गेली. त्यामुळे मराठी रसिकांमध्ये चुकीचा मेसेज गेला. आता आम्ही तिघांनी एकत्र येऊन मनसे चित्रपट सेना, चित्रपट महामंडळांच्या प्रयत्नांतून हा वाद मिटवला आहे. आता आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. यापुढेही आम्ही एकत्रित काम करून मराठी रसिकांची सेवा करणार आहोत.

छेड काढल्यानंतर पोलिसांना फोन करणाऱ्या तरुणीचा मोबाईल पळवला

वादाच्या पार्श्वभूमीवर संध्या केशे, प्रणिकेत खुणे आणि उमेश गवळी विविधमाध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले होते. या मराठी कलाकारांचे नुकसान होऊ नये, यांच्यात फूट पडू नये, म्हणून मनसेने चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि मनसेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांच्या माध्यमातून चित्रपट महामंडळाच्या लवादासमोर हा वाद मिटवला आहे. मराठी कलाकारांनी एकमेकांचे पाय न ओढता, यापुढे एकत्र राहून अधिक चांगले काम करावे. या कलाकारांना सर्व मदत करण्याची मनसेची भूमिका राहील असे मनसेचे पुणे उपशहराध्यक्ष जयराम लांडगे यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड