पुण्यात पावसाच्या पाण्यात कागदी नाव सोडून आंदोलन; महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 02:51 PM2021-09-27T14:51:12+5:302021-09-27T15:52:33+5:30

वाघोली येथील भावडी फुल मळा रोडवरील 30 ते 40 सोसायटी असून महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होत आहे

agitation leaving paper boat rainwater citizens aggressive wagholi | पुण्यात पावसाच्या पाण्यात कागदी नाव सोडून आंदोलन; महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

पुण्यात पावसाच्या पाण्यात कागदी नाव सोडून आंदोलन; महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

Next
ठळक मुद्देपावसाळ्यात रस्ते जलमय होत आहेतपरिसरातील महिला नागरिकांनी या पाण्यामध्ये उतरुन व कागदी नाव सोडून अनोखे आंदोलन केले

पुणे:पुणे महानगरपालिकेमध्ये 34 गावांचा समावेश झाला असला तरीही या गावातील मूलभूत समस्यांकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. वाघोली गावचाही यात समावेश झाला आहे. रस्ता, कचरा, ड्रेनेज लाईनचा प्रश्न महानगरपालिकेने अजून सोडवलेला नाही म्हणून वाघोलीतील महिला आक्रमक झाल्या आहेत. या प्रश्नांसाठी महानगरपालिकेच्या विरोधात महिलांनी आंदोलन केले आहे.


वाघोली येथील भावडी फुल मळा रोडवरील 30 ते 40 सोसायटी असून महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होत आहे. पावसाळ्यात रस्ते जलमय होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला व मुले तसेच वाहनचालकांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना या पाण्यातून कशीबशी वाट काढत पुढे जावे लागत आहे. परिसरातील महिला नागरिकांनी या पाण्यामध्ये उतरुन व कागदी नाव सोडून अनोखे आंदोलन केले.

छेड काढल्यानंतर पोलिसांना फोन करणाऱ्या तरुणीचा मोबाईल पळवला

यावेळी हातामध्ये पाट्या घेऊन महिलांकडून महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केला गेला. महापालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर महानगरपालिकावर मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.

Web Title: agitation leaving paper boat rainwater citizens aggressive wagholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.