शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावरून वादंग; भांडारकर संस्थेबाहेर शिवप्रेमींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:30 IST

त्यांच्या विधानामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली

पुणे - मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानावर मराठा समाज आणि शिवप्रेमी आक्रमक झाले असून, भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी एकत्र येत निषेध नोंदवला.  राहुल सोलापूरकर यांनी आपल्या वक्तव्यात, छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीर आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन आग्र्याहून सुटले. पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत असं सांगत मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. हे विधान छत्रपतींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणीही  मराठा समाजाकडून करण्यात आली.

संस्थेबाहेर आंदोलन, राजीनाम्याची मागणीभांडारकर संस्थेबाहेर मराठा समाज आणि शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. आंदोलकांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे राहुल सोलापूरकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली. मात्र, संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र झाले. निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी संस्थेच्या मुख्य गेटच्या बाहेर रोखले. यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले. जोपर्यंत राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांकडून घेण्यात आली.संस्थेच्या भूमिकेचीही चौकशीची मागणीआंदोलकांनी संस्थेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संस्थेने आधी स्पष्ट करावे की, राहुल सोलापूरकर यांच्या विधानाशी ते सहमत आहेत का?" असा सवाल आंदोलकांनी केला. जर संस्था सहमत नसेल, तर त्यांच्या तातडीच्या राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.  पोलिस बंदोबस्त वाढवला  संस्थेबाहेर वाढत्या तणावामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ संवादाचा प्रयत्न झाला, मात्र तो निष्फळ ठरला. या प्रकरणावर संस्था आणि राहुल सोलापूरकर यांची अधिकृत प्रतिक्रिया अपेक्षित आहे.आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. राजीनामा न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.    

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीbhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणे