शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य, गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 20:22 IST

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, असे वादग्रस्त विधान भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२० मध्ये केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

बारामती : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, असे वादग्रस्त विधान भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२० मध्ये केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणातून पडळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.याबाबत पत्रकारांशी बोलताना खुद्द पडळकर यांनीच माहिती दिली. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर पडळकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींचा निधी रोखल्याचा आरोप केला आहे. यावर पडळकर म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी यावर तत्काळ बैठक घ्यावी. या बैठकीला सर्व ओबीसी नेत्यांना बोलवावे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित असावेत, त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

निधी अडवला असल्यास तो सोडता येईल, नसेल अडवला तर सांगता येईल. याबाबत स्पष्टता येईल, असे पडळकर म्हणाले. राष्ट्रवादीच्या प्रवक्ते यांनी प्रा. हाके यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याच्या प्रश्नावर पडळकर म्हणाले, टीका करण्याऐवजी त्याचे उत्तर देऊन शंकेचे निरसन करावे. राज्याला देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा गृहमंत्री मिळाला आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत शासन संवेदनशील आहे. गृहमंत्री या विषयावर लक्ष ठेवून आहेत, अशा शब्दांत पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे काैतुक केले.

धनगर आरक्षण प्रश्नावर पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. धनगर समाजासाठी सरकारने अनेक योजना केल्या. मात्र, आरक्षण प्रश्नाचा निकाल लावण्याची मागणी होत आहे. ३१ मे च्या पार पडलेल्या कार्यक्रमात याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी मांडली आहे. नक्कीच आम्ही तो विषय मार्गी लावू. धनगर समाजाचे कार्यकर्ते बसून अजेंडा ठरवून आरक्षण प्रश्नावर पुढाकार घेणार असल्याचे पडळकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवार