शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वेगाने जाणाऱ्या वाहनांवर बसणार अंकुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 16:47 IST

वेगाने गेल्याने होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांना इंटरसेप्टर व्हेईकल..

ठळक मुद्दे शहर पोलीस दलाला सध्या २ वाहने देण्यात आली असून आणखी दोन वाहने मिळणार कारवाई होणार सोपी : ५० टक्के अपघात कमी करण्याचे लक्ष्य

पुणे : राज्यातील महामार्गावरील तसेच शहरातील महत्वाच्या मार्गावरुन वेगाने गेल्याने होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांना इंटरसेप्टर व्हेईकल देण्यात आले असून त्याद्वारे अशा वाहनांवर अंकुश ठेवण्यात येणार आहे़. राज्यातील पोलिसांना सध्या ९६ अशी वाहने देण्यात येणार असून शनिवारी त्यातील काही वाहनांचे वितरण पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात पोलीस आयुक्त डॉ़. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले़. यावेळी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पोलीस बिनतारी संदेशचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधिक्षक विजय पाटील व मिलिंद मोहिते यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते़. यावेळी विनय कारगांवकर यांनी सांगितले की, महामार्गावरील प्राणघातक अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाय योजण्यात येत आहेत़. त्याचाच एक भाग म्हणून अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन त्यांच्यात जनजागृती व्हावी, म्हणून इंटरसेप्टर व्हेईकल खरेदी करण्यात आली आहेत़. पहिल्या टप्प्यात ९६ वाहने राज्यभरातील पोलिसांना येत्या १० ऑक्टोबरपर्यंत वितरित करण्यात येणार आहे़. यामुळे महामार्गावर ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कारवाई केली जाणार आहे़. डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले की, शहर पोलीस दलाला सध्या २ वाहने देण्यात आली असून आणखी दोन वाहने मिळणार आहेत़. शहरातील प्राणघातक अपघात कमी करण्याचा नागरिकांच्या सहकार्याने पोलीस प्रयत्न करीत आहेत़ त्यात आतापर्यंत ३३ टक्के प्राणघातक अपघात कमी झाले असून आमचे लक्ष्य ५० टक्के अपघात कमी करण्याचे आहे़. ़़़़़़़़़़़़

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर