Video - संविधानात 'इंडिया'ऐवजी भारत असा उल्लेख असावा, स्वदेशी जागरण मंचाचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 14:25 IST2019-06-09T12:52:30+5:302019-06-09T14:25:10+5:30
भारतीय संविधानावर संशोधन होऊन इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरला जावा, याबाबत सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, असे स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अशवनी महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Video - संविधानात 'इंडिया'ऐवजी भारत असा उल्लेख असावा, स्वदेशी जागरण मंचाचा ठराव
पुणे - भारतीय संविधानावर संशोधन होऊन इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरला जावा, याबाबत सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, असे स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अशवनी महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स्वदेशी जागरण मंचाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत 'इंडिया दॅट इज भारत' असा उल्लेख वगळून भारत असा उल्लेख असावा, याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला. योजना आयोग बरखास्त करून नीती आयोग स्थापन करण्याचा निर्णय योग्यच होता. मात्र, नीती आयोगाची कार्यपद्धती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विकासाची व्याख्या एफडीआय, जीडीपी वरून न ठरवता सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. वॉलमार्ट अन्न प्रक्रियेमध्ये आल्यास छोट्या उद्योजकांचे अस्तित्वच धोक्यात येईल अमेरिका डेअरी उत्पादनासाठी भारतावर दबाव आणत आहे.मात्र, ती डेअरी उत्पादने मांसाहारी गायींपासून बनवलेली असल्याने भारताने हा करार करू नये. आरसेपअंतर्गत चीनशी करार केल्यास चिनी वस्तुंना विरोध करण्याचा हक्क भारत सरकार गमावून बसेल.