शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
NEET Paper Leak : प्रश्न जुळवल्यानंतर मला धक्काच बसला', नीट पेपरफुटी उघडकीस आणणाऱ्या शिक्षकांची मोठी माहिती
3
'मेलोडी गिफ्ट'वर राहुल गांधींची टीका; म्हणाले, "शेतकरी, तरुण, महिला, कामगार, व्यापारी रडत असताना..."
4
१२ मे २०२५ ते १२ मे २०२६; ओळख, लग्न अन् वर्षभरातच ट्विशा शर्माच्या आयुष्याचा भयंकर शेवट!
5
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
6
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
7
Travel : भारताचं 'लिटिल इंग्लंड'! रोमँटिक ट्रीपचा प्लॅन करताय? मग 'या'हिल स्टेशनला नक्की भेट द्या
8
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
9
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
10
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
11
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
12
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
13
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
14
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
15
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
16
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
17
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
18
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
19
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
20
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
Daily Top 2Weekly Top 5

कसलं ते मंगेशकर कुटुंब, लुटारुंची टोळी आहे; 'दीनानाथ' रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवार यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:31 IST

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.

Deenanath Mangeshkar Hospital: पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करण्यास सांगितल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला होता. रक्कम जमा न केल्याने तनिषा भिसे यांच्यावरील उपचारांना उशीर झाला आणि त्या दगावल्या. यानंतर राजकीय पक्षांसह विविध नागरिक संघटनांनी रुग्णालयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर रुग्णालयाबाबत अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. दीनानाथ रुग्णालयाने गरीब रुग्णांचा ३० कोटींचा निधी वापरलाच नसल्याचे चौकशी अहवालातून समोर आलं आहे. यावरुनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला. या कुटुंबाकडे माणुसकी नसल्याचे वडेट्टीवारांनी म्हटलं.

तनिषा भिसे यांचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली. उपचारांसाठी आलेल्या भिसे कुटुंबियांकडे  डॉ. घैसास यांनी १० लाखांची रक्कम मागितल्याची कबुली  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिली होती. त्यानंतर  या धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठीचा ३० कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचे समोर आले आहे. यावरुनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबायांवर टीका केली. मंगेशकर कुटुंब लुटारुंची टोळी असल्याचे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

गरिबांना लुटायचे हे असले धंदे बंद झाले पाहिजेत - विजय वडेट्टीवार

"कसले ते मंगेशकर कुटुंब. ही लुटारुंची टोळी आहे. यांच्यापैकी कुणी कधी दान केल्याचे पाहिले आहे का? गाणं चांगले गायलं म्हणून सगळ्यांनी त्यांना मिरवलं. लता दीदी, आशा दीदी, हे दीदी, ते दीदी. त्यांचे एवढेच जर लोकांसाठी आणि देशासाठी समर्पण असतं तर त्यांनी सेवा केली असती. यांची स्टोरी मी रोज वाचतो आहे. ज्या खिलारे पाटलांनी त्यांना जमीन दिली त्यांनाही सोडलं नाही. यांच्यात कसली माणुसकी आहे? हे माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असे मी मानतो. अशा प्रकारे मॅनेटमेंट चालवून गरिबांची लूट करून शोषण करणारे असतील तर हे कलंक आहे. यामध्ये यांना कुणीही साथ देऊ नये. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. चॅरिटी म्हणून योजनेचा फायदा घ्यायचा आणि गरिबांना लुटायचे हे असले धंदे बंद झाले पाहिजेत," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

हे रुग्णालय मंगेशकर कुटुंबीयांनी मोठ्या मेहनतीने उभारलं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे स्वर्गीय लता मंगेशकर कुटुंबीयांनी मोठ्या मेहनतीने उभारलेल आहे. रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळं काही रुग्णालयाचे चुकीच आहे. जे चुकीचं आहे, तिथं चुकीचं म्हणाव लागेल. परंतु, ती चुक सुधरावी लागेल, ती चुक रुग्णालयाने सुधारल्यास मला आनंदच आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

दरम्यान, टीकेची झोड उठल्यानंतर  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने इमर्जन्सी मधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारPuneपुणेLata Mangeshkarलता मंगेशकरAsha Bhosaleआशा भोसले