कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसची यवतमध्ये 'जम्बो' रॅली; १०० ट्रॅक्टर रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:41 PM2021-02-20T14:41:14+5:302021-02-20T14:41:56+5:30

मोदी सरकार हाय हाय, अहंकारी सरकारला घरी बसवा, शेतकऱ्यांना न्याय द्या, काळे कृषी कायदे मागे घ्या यांसारख्या घोषणांनी केंद्र सरकारचा निषेध

Congress 'jumbo' rally in Yavat against agricultural laws; 100 tractors on the road | कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसची यवतमध्ये 'जम्बो' रॅली; १०० ट्रॅक्टर रस्त्यावर

कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसची यवतमध्ये 'जम्बो' रॅली; १०० ट्रॅक्टर रस्त्यावर

Next

यवत : मोदी सरकार हाय हाय, अहंकारी सरकारला घरी बसवा, शेतकऱ्यांना न्याय द्या, काळे कृषी कायदे मागे घ्या, अशी घोषणाबाजी करत, ढोल ताशा वाजवत केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात पुणे - सोलापूर महामार्गावर काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व ट्रॅक्टर रैलीत सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात ढोल-ताशा वाजवत घोषणा देत ही रॅली यवतमधून सकाळी ११ वाजता उरुळी कांचनच्या दिशेने गेली. 

काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी खासदार अशोक मोहोळ, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार संजय जगताप, तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे  ,जिल्हा सरचिटणीस मोसिन तांबोळी, सचिन रणदिवे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संपत फडके,विठ्ठल दोरगे,प्रदीप पोमन जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे हरेश ओझा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या रॅलीमध्ये १०० ट्रॅक्टर च्या जवळपास घेवून शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते हजर होते.  

Web Title: Congress 'jumbo' rally in Yavat against agricultural laws; 100 tractors on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.