शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:32 IST

राज्यशास्त्राच्या अभ्यासकांचे मत; देशाच्या राजकारणावर परिणाम

पुणे : देशात ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३ राज्यांत काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. या निकालांमुळे भारतीय जनता पक्षाकडून गेल्या काही वर्षात सुरू करण्यात आलेल्या काँग्रेसमुक्त भारत मोहीमेचा जनतेकडून पराभव करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे मत राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी व्यक्त केले.२०१९ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वीची सेमिफायनल म्हणून राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्याचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालानंतर काँग्रेस पुन्हा एकदा देशातील राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आला असल्याचे मत राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी व्यक्त केले.राज्यशास्त्राचे प्राध्यापक व राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी सांगितले, हिंदी पट्ट्यातील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाची हिंदुत्त्ववादी भुमिका विरूध्द काँग्रेसचे हिंदू विचारप्रणाली अशी लढत राहिली. काँग्रेसकडून राजकारणात हिंदू ही नवीन विचारप्रणाली आणली आहे. यापूर्वी महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांनी वापरलेली ही हिंदू विचारप्रणाली आहे. तेलंगणा, मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांनी चांगले यश मिळवून आपले अस्तित्त्व दाखवून दिल आहे.राज्यशास्त्राचे प्राध्यापक विलास आवारी यांनी सांगितले, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये भाजपाला अँटी इन्कबन्सीचा मोठा फटका बसला आहे. मध्यप्रदेशात भाजपा व काँग्रेसमधील जागांचे अंतर खूपच कमी आहे, याठिकाणी सत्ता मिळविण्याचा पुरेपुर प्रयत्न भाजपाकडून केला जाईल असे दिसते आहे.२०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून भारतीय राजकारणात आलेली मोदी लाट ओसरत असल्याचे चित्र या निकालांमधून पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनासह अनेक आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा खूप वाढविल्या होत्या. त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे प्रतिबिंब या निकालामध्ये पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी जगण्याच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी नेत्यांकडून वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करण्यावर भर दिला गेला होता. मंदिर, धर्म असे अस्मितेचे मुद्देही प्रचारात आणले गेले होते. या निकालांचा लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळेल.- नामदेव पवार, प्राध्यापक, राज्यशास्त्र

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालBJPभाजपाcongressकाँग्रेस