शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पुण्यात काँग्रेसची उमेदवार कोंडी; नेत्यांमध्येच मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:35 PM

अरविंद शिंदे यांनी बुधवारी रात्री उमेदवारी मिळाल्याचे सत्कार स्विकारल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात एकदाही त्यांच्या नावाची पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नाही.

ठळक मुद्देउमेदवारांमध्ये आघाडीवर असलेल्या एका नेत्याने थेट दिल्लीपर्यंत फोन करून व्यक्त केली तीव्र नाराजी आता अरविंद शिंदे यांच्याबरोबरीने माजी आमदार मोहन जोशी यांचेही नाव घेतले जात आहे.

पुणे: प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर होऊनही काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नसल्याने काँग्रेसची उमेदवार कोंडी झाल्याची टीका होत आहे. नेत्यांमधील मतभेदांमुळेच उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे समजते. बुधवारी रात्री अरविंद शिंदे यांनी उमेदवारी मिळाल्याचे सत्कार स्विकारल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात एकदाही पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नाही. रात्री उशिरापर्यंत शिंदे पक्के  आहेत की बदल होणार अशी शंका खुद्द काँग्रेस कार्यकर्तेच व्यक्त करत होते.बुधवारी रात्री शिंदे यांनी काँग्रेसभवनमध्ये उमेदवारी मिळाल्याचे सत्कार स्विकारण्यास सुरूवात केली. याचा पक्षातंर्गत कानोसा घेतला असता त्याचवेळी इच्छुक उमेदवारांमध्ये आघाडीवर असलेल्या एका नेत्याने थेट दिल्लीपर्यंत फोन करून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली. त्यात महापालिकेतील २९ नगरसेवकांची संख्या थेट ९ वर आणल्याचे हे बक्षिस आहे का अशी विचारणा करण्यात आली. जातीवर आधारीत उमेदवारी देत असाल तर मग त्यांच्यामागे त्यांचा किती समाज आहे ते तरी स्पष्ट आहे का असा आक्षेप नोंदवण्यात आला. त्यामुळे केंद्रीय निवड समितीच्या सदस्यांची चलबिचल होऊन उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्याचे लांबवण्यात आले असे काही काँग्रेसजनांचेच म्हणणे आहे. शुक्रवारीही दिवसभरात पुण्यातील काही जुन्या पदाधिकाºयांनी राज्य तसेच दिल्लीत फोनाफोनी करून शिंदे यांच्या उमेदवारीबद्धल नाराजी व्यक्त केली. पक्षाने केंद्रीय स्तरावरून नियुक्त केलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल यांना हे फोन करण्यात आल्याचे समजले. निरीक्षक या नात्याने त्यांनी केंद्रीय निवड समितीच्या अन्य सदस्यांना याची माहिती दिली. राज्यस्तरावरील एका नेत्याने शिंदे यांचे नाव लावून धरले, मात्र त्या नेत्याबाबतही केंद्रीय नेतृत्त्व नाराज असल्यामुळे त्यांना किती महत्व द्यायचे असा प्रश्न समितीच्या सदस्यांसमोर निर्माण झाला व पक्षश्रेष्ठींनाच याचा निर्णय घेऊ द्यावा असे ठरवण्यात आले. त्यामुळे काही सदस्यांनी पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांना याबाबत सुचित करण्याची जबाबदारी घेतली असल्याची माहिती मिळाली. ते शुक्रवारी दिवसभरात या सदस्यांना उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यामुळेही निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.दरम्यान आता शिंदे यांच्याबरोबरीने माजी आमदार मोहन जोशी यांचेही नाव घेतले जात आहे. त्याचबरोबर पक्षात नसलेले मात्र तरीही उमेदवारीची मागणी केलेले प्रविण गायकवाड यांचीची चर्चा पुन्हा सुरू असल्याची माहिती मिळाली. उमेदवाराचे नाव अखेरपर्यंत गुप्त ठेवायचे या काँग्रेस परंपरेशी अनुसरूनच हे सर्व चालले असल्याचे प्रतिक्रिया एका काँग्रेस कार्यकर्त्याने याबाबत लोकमत बरोबर बोलताना व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा