शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पुणे पदवीधर निवडणूक : मतदार यादी व मतदान केंद्रांचा गोंधळामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 2:16 PM

मतदान केंद्र सापडता सापडेना ; दुबार मतदारांमुळे बोगस मतदानाची शक्यता 

ठळक मुद्देकोरोनानंतर राज्यात प्रथमच सार्वत्रिक निवडणूक

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे  : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार (दि.1 डिसेंबर ) रोजी मतदान होत आहे. परंतु मतदार यादीतील चुका, दुबार ते तब्बल दसबार मतदार, छायाचित्र नसलेले मतदार, नावातील चुका,  चुकीचा ओळखपत्र क्रमांक हा मतदार यादीतील गोंधळ कमी असताना मतदान केंद्रांमुळे या गोंधळात अधिकच भर पडली आहे. गोखलेनगरमध्ये राहणा-या मतदाराचे नाव कॅम्पमध्ये धायरीच्या मतदाराचे नाव कात्रजमध्ये कोथरूडच्या मतदाराचे नाव बाणेरमधील मतदान केंद्रावर आले आहे. यामुळे मतदानावर कोरोनाचे सावट असताना प्रशासनाच्या कारभाराचा मतदानाच्या टक्केवारील मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कोरोनानंतर राज्यात प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ न देताच राज्यातील पदवीधर व शिक्षक  मतदार संघाच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात कोरोनाचे संकट यामुळे प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली आहे. पुणे विभागातील पाचही जिल्हा हा निवडणुकीचे कार्यक्षेत्र असून, विभागात पदवीधर आणि शिक्षक सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आगोदर मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्यात आली. यामध्ये या शेवटच्या दिवसात अर्ज केलेल्या शंभर टक्के लोकांची नावे मतदार मतदार यादी घेण्यात आली आहेत. ही नावे यादीत समाविष्ट करताना कोणत्याही प्रकारची चाळणी लावली गेली नाही. यामुळे एकाच मतदाराचे नाव दहा,आठ वेळा यादीत आले आहे. दुबार मतदारांची संख्या तर खूपच मोठी आहे. यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता अधिक आहे. 

दरम्यान पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी 232 तर शिक्षक मतदार संघासाठी 125 मतदान केंद्र आहेत. यात सर्वाधिक हवेली तालुक्यात मतदार आणि मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 15 किलो मीटर हद्द लक्षात घेऊन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु सर्वसामान्य मतदारांना आता मतदान केंद्र शोधणे म्हणजे मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहेत. त्या सध्या पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मतदारांमध्ये संसर्गाची भिती आहेतच. यामुळे पदवीधर,  शिक्षक मतदार संघात नक्की किती टक्के मतदान होणार याकडे सर्वांचे दक्ष लागले आहे. -------पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघाची पुणे जिल्ह्याची माहिती  - पदवीधर एकूण उमेदवार : 62 - शिक्षक एकूण उमेदवार  : 35 -------पुणे जिल्ह्यातील एकूण पदवीधर मतदार  : 136611-पुणे जिल्ह्यातील एकूण शिक्षक मतदार  : 32201----------  पुणे जिल्ह्यातील पदवीधर एकूण मतदान केंद्र  : 232-पुणे जिल्ह्यातील शिक्षक एकूण मतदान केंद्र : 125 ---------- मतदारांना आवाहन ..... येथे शोधा मतदान केंद्र पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघात नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना आवाहन करणेत येते की, पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघा साठी भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मंगळवार 1 डिसेंबर राजी  सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० पर्यत मतदान होणार आहे. या दिवशी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे . पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी व आपले मतदान केंद्राची माहिती घेण्यासाठी खालील संकेतस्थळ व लिंकचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. १. http://pune.gov.in2. http://103.23.150.139/GTSearch2020/

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार