जैन बोर्डिंगच्या जागेतच जैन मंदिर असल्याची खातरजमा; सह धर्मादाय आयुक्तांनी सादर केला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:38 IST2025-10-29T10:38:22+5:302025-10-29T10:38:52+5:30

मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगमध्ये १ हजार ४५२ चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असून, तेथे जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात

Confirmed that there is a Jain temple on the site of Jain boarding house; Joint Charity Commissioner submitted a report | जैन बोर्डिंगच्या जागेतच जैन मंदिर असल्याची खातरजमा; सह धर्मादाय आयुक्तांनी सादर केला अहवाल

जैन बोर्डिंगच्या जागेतच जैन मंदिर असल्याची खातरजमा; सह धर्मादाय आयुक्तांनी सादर केला अहवाल

पुणे: शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने बोर्डिंगची जागा विकण्यासाठी परवानगी मागताना केलेल्या अर्जात या मंदिराचा उल्लेख केला नसल्याचा आक्षेप जैन बोर्डिंग बचाव कृती समितीतर्फे याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यावर धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंगच्या जागेच्या आवारात जैन मंदिर आहे का, याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सह धर्मादाय आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी आपला अहवाल धर्मादाय आयुक्तांना मंगळवारी सादर केला असून, त्यामध्ये बोर्डिंगच्या जागेतच भगवान महावीर यांचे मंदिर असल्याची खातरजमा केली आहे.

ट्रस्टने बोर्डिंगची जागा विकण्यासाठीच्या परवानगी अर्जात या मंदिराचा उल्लेख केला नसल्याचे ॲड.सुकौशल जिंतूरकर आणि ॲड.योगेश पांडे यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यावर २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंगच्या जागेच्या आवारात जैन मंदिर आहे का, याची पाहणी करून २७ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सह धर्मादाय आयुक्तांना दिले होते. त्याप्रमाणे, मॉडेल कॉलनीतील शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगमध्ये १ हजार ४५२ चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असून, तेथे जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात, अशी खातरजमा केली. याबाबत सविस्तर अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला आहे. हे मंदिर सार्वजनिक न्यास कार्यालयात नोंदणीकृत नसले, तरी शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या स्थावर मालमत्तेत असल्याने त्यांची मालकी आहे. बोर्डिंगचे अधीक्षक आणि विद्यार्थी या मंदिराची देखभाल करतात, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

दरम्यान, सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षकांनी पाहणीच्या दरम्यान ट्रस्टच्या विश्वस्तांचा जबाब नोंदविला. त्यामध्ये जैन बोर्डिंगच्या पुनर्विकासाच्या दरम्यान मंदिराच्या कोणत्याही भागाला नुकसान पोहोचणार नाही, तसेच ते हटविले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. ट्रस्ट आणि विकासक कंपनीमध्ये ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या जागेच्या विक्री करारनाम्याच्या कलम तीनमध्ये त्याचा उल्लेख आहे. मात्र, त्याबाबतची लेखी हमी विकासकच धर्मादाय आयुक्तांसमोर देऊ शकतो, असेही या अहवालात सुचविण्यात आले आहे. या तेरा पानी अहवालासमवेत ४३१ पानांचे संबंधित दस्तावेजही जोडण्यात आले आहेत.

Web Title : जैन बोर्डिंग भूमि पर जैन मंदिर की पुष्टि; धर्मादाय आयुक्त ने रिपोर्ट सौंपी

Web Summary : रिपोर्ट में बिक्री के लिए अनुरोधित बोर्डिंग भूमि के भीतर जैन मंदिर की पुष्टि की गई। ट्रस्ट के आवेदन में मंदिर का उल्लेख नहीं था। आश्वासन दिया गया: पुनर्विकास के दौरान मंदिर को कोई नुकसान नहीं होगा। डेवलपर लिखित गारंटी देगा।

Web Title : Jain Temple Confirmed on Boarding Land; Charity Commissioner Submits Report

Web Summary : Report confirms Jain temple within boarding land requested for sale. Trust's application lacked temple mention. Assurance given: temple won't be harmed during redevelopment. Developer to provide written guarantee.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.