शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

पुणे शहरात ‘ भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 20:31 IST

राज्यभरात पेट्रोलदरवाढीचा भडका उडाला असताना त्याच्या निषेधार्थ देशभरात विरोधी पक्षांकडून ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली होती.

ठळक मुद्देसर्वपक्षीय सहभाग : बसेसच्या तोडफोड ऐवजी हवा सोडलीकाही शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला तर अनेक शाळांचे वर्ग नियमितपणाने सुरु अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबागेत मात्र गर्दी

पुणे : राज्यभरात पेट्रोलदरवाढीचा भडका उडाला असताना त्याच्या निषेधार्थ देशभरात विरोधी पक्षांकडून ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली होती. त्यानिमित्त सोमवारी (दि.१०) शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बंदमध्ये सर्वपक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. बंदला काही ठिकाणी लागलेले हिंसक वळण वगळता अन्य ठिकाणी शांततामय वातावरणात बंद पार पडला. पेट्रोलचा सातत्याने वाढत जाणारे दर यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. महागाईने नागरिकांची डोकेदुखी वाढत चालली असताना ती दूर करण्यासाठी सरकारकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. यामुळे सरकारला जाग यावी, तसेच त्यांना जाब विचारण्यासाठी ’’भारत बंद’’ पुकारण्यात आला होता. सरकारी कार्यालये मात्र नियमित सुरु होती. याशिवाय काही शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला तर अनेक शाळांचे वर्ग नियमितपणाने सुरु असल्याचे पाहवयास मिळाले. बाजारपेठांमधील सर्व व्यवहार ठ्प्प होते. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबागेत मात्र गजबजाट होता. खरेदीकरिता गर्दी होती. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या रस्त्यांवरील दुकाने बंद होती. शनिवार, नारायण, रविवार पेठेतील दुकानदारांनी दुकाने अर्धवट बंद करुन  त्यास पाठींबा दिला. सजावटीच्या सामानाकरिता रविवार पेठेतील बोहरी आळीत देखील खरेदीसाठी तुरळक स्वरुपात गर्दी होती. जंगली महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्त्यांवरील अनेक पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. उपनगरांमध्ये देखील बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरात बंद मध्ये विविध राजकीय पक्ष सहभागी झाले होते. त्यांनी याप्रसंगी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणा व निदर्शंने केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंदला पाठींबा दर्शवत त्यात सक्रिय सहभाग नोंदवला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसेसची हवा सोडून देवून आपला राग व्यक्त केला. यासगळ्यात ’’तब्बल 12 वेळा केली पेट्रोल -डिझेलच्या दरात उत्पादन शुल्कवाढ, चार वर्षात केली जनतेकडून अकरा लाख कोटींची लूट. पुणेकरांनो आपण गप्प का? पुणे कॉग्रेसकडून शहरभरात लागलेल्या या निषेधाचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. दरवाढीच्या निषेधार्थ कॉग्रेस कार्यकर्त्यांनी मंडईत टांग्यातून प्रवास क रत निषेध व्यक्त केला. 

*  फर्ग्युसन रस्त्यावर शुकशुकाट एरवी प्रचंड वाहतूकीच्या रहदारीमुळे गजबजाट असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर सोमवारी शुकशुकाट दिसून आला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याशिवाय खानपानाकरिता या रस्त्यावरील वेगवेगळ्या उपहारगृहांमध्ये गर्दी करणा-या तरुणाईला मात्र सोमवारी कडकडीत बंदला सामोरे जावे लागले. अत्यावश्यक सोयीसुविधेची सेवा उपलब्ध करुन देणारी औषधविक्रीची दुकाने वगळता इतरांनी बंदमध्ये सहभाग घेतला.  

टॅग्स :PuneपुणेBharat Bandhभारत बंदcongressकाँग्रेसPetrolपेट्रोलMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस