शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतून अभ्यासक्रम पुर्ण करता यावा यासाठी फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या अांदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:30 IST

फर्ग्युसन महाविद्यालयातील बीएच्या विद्यार्थ्यांनी इतिहास व समाजशास्त्र विषयांचे अभ्यासक्र मराठीतून पूर्ण करता यावेत यासाठी प्राचार्यांच्या खाेलीबाहेर ठिय्या अांदाेलन केले.

पुणे :  फर्ग्युसन महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून हद्दपार करण्याच्या हेतूने बीएच्या विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचा अाराेप करत बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या अांदाेलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विराेधात घाेषणा दिल्या. तसेच मराठीतून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी लावून धरली. 

    फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अात्तापर्यंत इंग्रजी अाणि मराठी या दाेन्ही माध्यमांमधून पाॅलिटिकल सायन्स, अर्थशास्त्र, इतिहास, मराठी, मानशास्त्र विषायात अभ्यासक्रम पूर्ण करता येत हाेता. परंतु महाविद्यालय प्रशासनाने इतिहास अाणि समाजशास्त्र विषयासाठी मराठीतून अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही असे अचानक जाहीर केले. त्यामुळे दुसऱ्या विर्षासाठी मराठीतून अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 50 ते 60 विद्यार्थ्यांनी  प्राचार्यांच्या खाेली बाहेर ठिय्या अांदाेलन केले. या अांदाेलनाला जनता दल युनायटेडचे सरचिटणीस कुलदीप अांबेकर यांनी पाठींबा दिला हाेता.  याबाबत बाेलताना काैस्तुभ पाटील हा विद्यार्थी म्हणाला, महाविद्यालयाने दुसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रीया सुरु असताना अचानकपणे इतिहास व समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमांना मराठीतून प्रवेश घेता येणार नाही असे जाहीर केले. तसेच महाविद्यालयाला हे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून घेण्यासाठी परवानगी नसल्याचे सांगितले. परंतु इतक्या वर्ष हे अभ्यासक्रम मराठीतून हाेत असताना यंदाच्या वर्षी अचानक का बंद करण्यात येत अाहे याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाने कुठलेही उत्तर दिले नाही. मराठी माध्यमाला शिकणारी मुले ही गावाकडील गरीब घरातील विद्यार्थी अाहेत. त्यांना अचानक इंग्रजीमधून अभ्यासक्रम पुर्ण करता येणे शक्य नाही. महाविद्यालयाला मराठीतील अभ्यासक्रम बंद करुन सर्व अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये करायचे अाहेत. असे झाल्यास गरीब विद्यार्थ्यांना फर्ग्युसन मधून शिक्षण घेता येणार नाही. 

    महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी संध्या साेनवणे म्हणाली, या विषयाबाबत प्राचार्य व उपप्राचार्य यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून संवाद साधण्यात येत हाेता. प्रशासनाकडून अाधीपासूनच या अभ्यासक्रमांना मान्यता नसल्याचे अाधी सांगण्यात अाले. यंदाच्या वर्षापासून मराठीतून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नसल्याचे महाविद्यालयाने जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनी ठिय्या अांदाेलन केले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी द्यावी. ------------------------------------बीएच्या विद्यार्थ्यांना इतिहास आणि समाजशास्त्र विषयात मराठी माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याला यापूर्वी परवानगी देण्यात येत होती. मात्र, यंदापासून शिक्षण विभागाच्या नियमांनुसार हे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून करता येणार नसल्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास त्यांना मराठी माध्यमातून इतिहास आणि समाजशास्त्र विषय घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी मिळण्याबाबत प्रयत्न करू. मात्र, यंदा बीए प्रथम वर्षाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमांची माहिती देऊन प्रवेश घ्यायला लावू.- डॉ. आर. जी. परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी