शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक करू शकणार लोकपालकडे तक्रार

By admin | Updated: June 7, 2015 02:55 IST

राज्यात अजूनही विजेच्या समस्या कमी होत नसल्याने आणि ग्राहकांच्या समस्या वेळेवर सोडविल्या जात नसल्याने वीज कंपनीने पुढाकार घेत विद्युत लोकपाल या पदाची स्थापना केली आहे.

पुणे : राज्यात अजूनही विजेच्या समस्या कमी होत नसल्याने आणि ग्राहकांच्या समस्या वेळेवर सोडविल्या जात नसल्याने वीज कंपनीने पुढाकार घेत विद्युत लोकपाल या पदाची स्थापना केली आहे. तक्रार निवारण कक्ष (आयजीआरसी), ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच (सीजीआरएफ) यांच्याकडे ग्राहकाच्या समस्येचे निराकरण न झाल्यास आता ग्राहक थेट विद्युत लोकपालकडे धाव घेऊ शकणार आहे. तेथे ६० दिवसांत ग्राहकास न्याय मिळणार आहे.विद्युत लोकपालच्या कार्यालयाची स्थापना मुंबई येथे झाली असून, त्याची कार्यकक्षा १५ जिह्यांसाठी आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्याचे काम मुंबई विद्युत लोकपाल पाहणार आहेत, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांंचे काम नागपूर विद्युत लोकपाल पाहणार आहे, अशी माहिती मुंबई विभागाचे विद्युत लोकपाल आर. डी. संख्ये यांनी दिली. महावितरणचे मुख्य अभियंता नीलकंठ वाडेकर, जिल्हा वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष शहाजी शेळके आदी या वेळी उपस्थित होते. संख्ये म्हणाले, तक्रारदाराने प्रथम आयजीआरसी यांच्याकडे तक्रार दाखल करावी. तेथे दोन महिन्यांत कोणतीही कारवाई झाली नाही, तर सीजीआरएफमध्ये तक्रार नोंदवावी. तिथेही तक्रारदाराचे समाधान न झाल्यास ६० दिवसांच्या आत ग्राहकाने विद्युत लोकपालकडे तक्रार नोंदविणे गरजेचे आहे. त्यानंतर ६० दिवसांच्या आत लोकपाल तक्रारदाराच्या तक्रारीचे निवारण करेल. विद्युत लोकपालकडे तक्रार दाखल करताना अर्जासोबत सीजीआरएफच्या आदेशाची प्रत असणे बंधनकारक आहे. तसेच तक्रार दाखल करताना कोणत्याही प्रकारची रक्कम अथवा शुल्क आकारण्यात येत नाही. विद्युत लोकपालसमोर सुनावणीदरम्यान ग्राहकाला तसेच कंपनीला वकील नेमता येणार नाही. ग्राहकाला आपली बाजू स्वत: किंवा प्रतिनिधीद्वारे मांडता येऊ शकणार आहे. (प्रतिनिधी)