सकाळी अजितदादांकडे तक्रार,रात्री मिळाला न्याय; निवृत्त शिक्षकांना हक्काची जमीन परत मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 12:32 PM2021-06-23T12:32:14+5:302021-06-23T12:35:01+5:30

फलटण तालुक्यातील ११ शिक्षकांनी निवृत्त झाल्यावर बारामतीमधील खंडोबानगर येथे ग्रुपमध्ये ६० गुंठे जागा विकत घेतली होती.

Complaint to Deputy CM Ajit Pawar in the morning, got justice at night; Retired teachers get back their rightful land | सकाळी अजितदादांकडे तक्रार,रात्री मिळाला न्याय; निवृत्त शिक्षकांना हक्काची जमीन परत मिळाली

सकाळी अजितदादांकडे तक्रार,रात्री मिळाला न्याय; निवृत्त शिक्षकांना हक्काची जमीन परत मिळाली

Next

बारामती (जि. पुणे) : एखादे काम होणारे असेल तर ते तातडीने पूर्णत्वाला नेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हातखंडा आहे. याची प्रचिती फलटण (जि. सातारा) येथील ११ निवृत्त शिक्षकांना आली. या शिक्षकांनी जमीन फसवणुकीबाबतची तक्रार सकाळी जनता दरबारात पवार यांच्या कानी घातली आणि रात्रीच हक्काची जमीन त्यांना मिळाली.

फलटण तालुक्यातील ११ शिक्षकांनी निवृत्त झाल्यावर बारामतीमधील खंडोबानगर येथे ग्रुपमध्ये ६० गुंठे जागा विकत घेतली होती. त्यातील ४० गुंठे जागा शहरातील तीन एजंटांच्या माध्यमातून विकली. त्यानंतर राहिलेली २० गुंठे विकण्याची जबाबदारीसुद्धा शिक्षकांनी त्या तिघांवरच टाकली. त्यांनी २० गुंठे विकली, परंतु फक्त १४ लाख रुपये दिले व राहिलेले १ कोटी २८ लाख ५० हजार उद्या देऊ, आज कायम खूश खरेदी (दस्त नोंदणी) करून द्या, असे विश्वासाने सांगितले. पहिला व्यवहार उत्तम झाल्याने फलटण शिक्षक ग्रुपने कायम खूश खरेदी करून दिले. परंतु काही तासातच त्या तिघांनी पलटी मारून आता राहिलेली रक्कम देत नसल्याचे सांगून, काय करायचे ते करा, असे सुनावले.

सोमवारी दस्त नोंदणी रितसर होणार होती. त्यामुळे रविवारी सकाळी अजित पवार यांच्या जनता दरबारात यातील काही जणांनी व्यथा मांडून, न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पवार यांनी उपस्थित अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात दोन्ही बाजू व सत्यता पाहून गुन्हेगार असतील त्यांना सदर रक्कम देऊन टाकण्यास सांगा, अशी सूचना केली. त्यानंतर त्वरित तिघांना ठाण्यामध्ये आणून पोलिसी खाक्या दाखवल्यावर दस्त पलटून देण्याचे लिहून दिले.

Web Title: Complaint to Deputy CM Ajit Pawar in the morning, got justice at night; Retired teachers get back their rightful land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.