अर्णब गोस्वामीविरोधात खडक पोलिसांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 23:52 IST2020-09-09T23:52:18+5:302020-09-09T23:52:24+5:30
गोस्वामी हे आपल्या पत्रकारितेचा गैरवापर करुन अफवा पसरवत आहेत.

अर्णब गोस्वामीविरोधात खडक पोलिसांकडे तक्रार
पुणे : पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत खडक पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार देण्यात आली आहे. हेतू पुर्वक अफवा पसरविल्या आणि चिथावणीखोर विधाने केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) शहराध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी ही तक्रार दिली आहे.
गोस्वामी हे आपल्या पत्रकारितेचा गैरवापर करुन अफवा पसरवत आहेत. ते भडकाऊ वक्तव्ये करीत आहेत़ सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे़ तरीही या प्रकरणात ते साक्षीदारांना फोन करुन उलट तपासणी घेत आहे. हे कायद्याविरुद्ध असल्याचे सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.