शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

महिलेच्या अंगचटीला जाणे कंपनी मालकाच्या अंगलट; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 11:07 IST

आरोपी मुकेश कलानी याची कोरेगाव पार्क परिसरात रिटेल कंपनी आहे. या कंपनीत पीडिता सिनियर कॉर्पोरेट मॅनेजर या पदावर काम करते....

पुणे : रिटेल कंपनीत काम करणाऱ्या महिला व्यवस्थापकासोबत (मॅनेजर) वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला आहे. याबाबत २६ वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्कपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मुकेश नयनमल कलानी (रा. शहनशाह सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग), ७८ (पाठलाग) आणि ३५१(२) (धमकी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश कलानी याची कोरेगाव पार्क परिसरात रिटेल कंपनी आहे. या कंपनीत पीडिता सिनियर कॉर्पोरेट मॅनेजर या पदावर काम करते. आरोपीने वारंवार संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आरोपीने फिर्यादी या राहत असलेल्या पत्त्यावर भेटवस्तू पाठवल्या. तसेच त्या जीममध्ये जात असताना व तिथून घरी परत जात असताना पाठलाग केला. तसेच ऑफिसच्या कामानिमित्त केबिनमध्ये बोलवून अश्लील स्पर्श करून जवळीक साधून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांना नेहमी संपर्कात राहा व वेळोवेळी भेटत जा, नाहीतर माझ्याकडे असलेले पार्टीचे व तुझ्यासोबतचे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अन्थोनी या करत आहेत.

टॅग्स :Koregaon Parkकोरेगाव पार्कPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी