सर्वसामान्यांचे बँकेतील पैसे असुरक्षित : विश्वास उटगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 07:04 PM2018-11-20T19:04:48+5:302018-11-20T19:12:45+5:30

देशभरातील बँका डबघाईला आलेल्या आहेत...

The common man's money in the bank is unsafe: vishwas utagi | सर्वसामान्यांचे बँकेतील पैसे असुरक्षित : विश्वास उटगी

सर्वसामान्यांचे बँकेतील पैसे असुरक्षित : विश्वास उटगी

Next
ठळक मुद्देबड्या कर्जदारांना अभयसर्व बँकातील ११० लाख कोटी ठेवी त्यापैकी १०५ लाख कोटी कर्ज वाटप नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने देशातील सेवाक्षेत्र बलाढ्य

पुणे: केंद्र सरकार देशातील बड्या कर्जदारांची कर्जे माफ करत आहे. ही कर्जे सर्वसामान्यांनी बँकांमध्ये विश्वासाने ठेवलेल्या ठेवीतून दिली गेलेली आहेत. ती बुडाली की बँक बुडाली व ठेवीदारांचा पैसाही बुडाला. त्यामुळे सध्या सर्वसामान्यांनी बँकांमध्ये ठेवलेले पैसे सुरक्षित नाहीत असे देशातील अर्थतज्ज्ञ सांगत असल्याचे प्रतिपादन बँक कर्मचारी महासंघ नेते विश्वास उटगी यांनी केले.
ज्येष्ठ कामगार नेते अप्पासाहेब भोसले यांच्या १६ व्या स्मृती दिनानिमित्त पुणे महापालिका कामगार युनियनच्या वतीने श्रमिक भवन, एकलव्य सभागृह येथे उटगी यांच्या कार्पोरेट जगतातून होणारी लूट या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदय भट होते. 
उटगी म्हणाले, नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने देशातील सेवाक्षेत्र बलाढ्य झाले आहे. शेती व्यवसाय लयास गेला म्हणून शेतकरी हवालदिल अवस्थेत आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. तरी देखील जनता गप्प का? असा सवाल उपस्थित कामगारांना उटगी यांनी केला. देशभरातील बँका डबघाईला आलेल्या आहेत. सर्व बँकातील ११० लाख कोटी ठेवी आहेत त्यापैकी १०५ लाख कोटी कर्ज वाटप केले आहेत. त्या कर्जांपैैकी १८ लाख कोटी कर्ज बुडीत आहे. ते वसूल झाले नाही तर देशातील काही बँका बंद पडून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडल्या शिवाय राहाणार नाही अशा इशारा अर्थ तज्ञांनी दिला आहे. 
  केंद्र सरकारच्या  लोकशाही विरोधी व कामगार विरोधी धोरणाला विरोध  करण्यासाठी  देशभरातील  सर्व क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, प्राध्यापक, मध्यमवर्गीय यांनी एकजुटीने एकत्र लढल्याशिवाय पर्याय नाही असे नमूद करून ८ जानेवारीच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.  शालेय परिक्षात ५०टक्के गुण मिळवणाºया मुला मुलींना देखील हजारोंच्या संख्येने रोख पारितोषिके देण्यात आली. शिक्षणाचे स्वरूप बदलल्याने मागील वषार्पासून या योजनेत बदल करून इयत्ता ९ वी पासून पुढे शैक्षणिक पात्रता व ६५% गुण मिळवणाºयाा मुला मुलींना पारितोषिक देण्यात आले.  चंद्रकांत गमरे यांनी आभार व्यक्त केले.                

Web Title: The common man's money in the bank is unsafe: vishwas utagi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.