शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सुरू होणारी महाविद्यालये पुन्हा बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 19:12 IST

पुणे : गेल्या दीड वर्षानंतर पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली होती. त्यानंतर ...

पुणे: गेल्या दीड वर्षानंतर पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली होती. त्यानंतर महाविद्यालये सुरू केल्यावर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात लसीकरण देण्याची सोयही उपलब्ध केली जाईल, असे पुणे महापालिकेने सांगितले होते. त्यामुळे मंगळवारी पुण्यातील महाविद्यालये सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र काही महाविद्यालयांचा अपवाद वगळता बहुतांश सर्व महाविद्यालये बंद असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे आता सुरू होणारी ही महाविद्यालये पुन्हा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लेखी आदेशाविना महाविद्यालये कशी उघडायची?

महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्याच्या उच्च शिक्षण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अद्याप महाविद्यालयांना कोणतीही लेखी सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महाविद्यालयांकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. शासनाकडून लेखी आदेश प्रसिध्द केल्यानंतरच महाविद्यालये सुरू होतील, असे विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.

विद्यापीठाची भूमिका-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यातील कोरोना स्थिती सुधारत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालये काही निर्बंधासह सुरू करण्यास परवानगी जाहीर झालेली आहे ही आनंदाची बाब आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या व शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येत असून महाविद्यालये पूर्वतयारी करीत आहेत. अहमदनगर, नाशिक तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रात देखील परवानगी बाबत संबधित सक्षम प्राधिकरणाशी विचार विमर्श सुरू असून वस्तीगृहाबाबत देखील पूर्वतयारी सुरू आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांची संख्या विचारात घेता सुरक्षिततेला प्राधान्य देत टप्प्या टप्प्याने प्रक्रिया राबविणे संदर्भात राज्य शासन व उच्च शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतPuneपुणेcollegeमहाविद्यालयCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार