महाविद्यालयाच्या प्राचार्याची इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 15:59 IST2020-12-30T14:56:12+5:302020-12-30T15:59:00+5:30
आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

महाविद्यालयाच्या प्राचार्याची इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
पुणे : पिंपरी- चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन वैजनाथ परिश्वाड (वय ६०, रा. हर्ष पॅराडाईज) यांनी औंध येथे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.
परिश्वाड हे औंधमधील नागरस रोडवरील हर्ष पॅराडाईज या सोसायटीमध्ये राहत होते. त्यांची दोन्ही मुले जर्मनी व स्वीडन येथे वास्तव्यास आहे. ते पत्नीसमवेत येथे राहत होते. त्यांनी सोमवारी रात्री १० वाजता इमारतीच्या तिसर्या मजल्यावरुन उडी मारली. सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने ही घटना पाहिली. त्यांनी तत्काळ सोसायटीतील नागरिकांनी माहिती दिली. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. परिश्वाड यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईट नोट लिहिली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.