Bhor: महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग प्रकरणी ७ जणांना अटक, तीन जण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 17:13 IST2023-06-24T17:11:44+5:302023-06-24T17:13:00+5:30

मुख्य आरोपीसह तीनजण अद्याप फरार असून भोर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत...

College girl molestation case; 7 persons arrested, three absconding bhor crime news | Bhor: महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग प्रकरणी ७ जणांना अटक, तीन जण फरार

Bhor: महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग प्रकरणी ७ जणांना अटक, तीन जण फरार

भोर (पुणे) : तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, मारहाण करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सात जणांना भोर पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. मुख्य आरोपीसह तीनजण अद्याप फरार असून भोर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मुलीच्या विनयभंग आणि मारहाण प्रकरणी भोर पोलिसात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तीनजण फरार आहेत अटक केलेले खालीलप्रमाणे रोहित हनुमंत शिंदे (वय २३), प्रतीक दत्तात्रय दुधाळ (वय २२, घेही रा. वेनवडी) प्रवीण ऊर्फ सोन्या अनिल बांदल (वय २३, ब. खानापूर, ता. भोर), मयूर संजय साळेकर (२१, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा), तुषार ऊर्फ चिक्या रवींद्र शिवतरे (वय २४, रा. उत्रौली, ता. भोर), संकेत संजय शिक्रे (वय २६, रा. भोलावडे, ता. भोर),समीर कैलास जाधव (वय २७, रा. मोरगाव, ता. बारामती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून मुख्य आरोपी अक्षय किसन शिंदे (रा. वेनवडी, ता. भोर), आदील जमादार (रा. संजयनगर, भोर) आणि बाबू शिंदे (रा. वेनवडी) हे तिघे फरारी आहेत भोर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: College girl molestation case; 7 persons arrested, three absconding bhor crime news