शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षांच्या पिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 12:37 AM

जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.

राजुरी  - जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.जुन्नर तालुक्यात बागायती शेती करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष या पिकांबरोबरच खरीप हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा, कांदा, लसूण यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. यावर्षी पंधरा वर्षांनंतर प्रथमच विक्रमी थंडी पडली आहे. याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये पिंपळवंडी परिसरात नगदी पीक असणारे द्राक्ष पिकाची १५० एकरवर शेतकºयांनी लागवड केली आहे.थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या आकारात फरक पडला असून, त्यांच्या फुगवण्या थांबले आहेत. तसेच त्यांच्यामध्ये शर्करेचे प्रमाण पण अत्यंत अल्प आहे. यामुळे द्राक्षाच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहावयास मिळत आहे.तसेच व्यापाºयांनी स्वत:चा ग्रुप करून शेतकºयांकडून द्राक्षे खरेदी करण्यास सुरुवात केल्यामुळे, द्राक्षाचे भाव कोसळले आहेत. यामुळे सध्या द्राक्षाचा भाव फक्त ५० रुपये किलो झाल्यामुळे, द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. अशीच अवस्था ३00 एकरांवर लावलेल्या केळी या पिकाची झाली असून, केळीचे फन पिवळे पडले असून, त्याच्यावर करपा रोगाने अतिक्रमण केले आहे. जुन्नर तालुक्यामध्ये एक हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर केळी या पिकाची लागवड केली असून, थंडीमुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.तालुक्यामध्ये सुमारे २ हजार एकरांवर शेतक-यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. थंडीमुळे डाळिंबाच्या फळबागेतील गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. असे जरी असले तरी, सर्वसामान्यांना हुडहुडी भरवणारी थंडी गहू, हरभरा, लसूण, कांदा या खरीप पिकांना मात्र वरदान ठरणार आहे.थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षमण्याच्या आकारमानात घट झाली आहे. झाडांचा विकास होत नाही तसेच मनी क्रॅक होण्याचे प्रमाण वाढणार आहे यामुळे द्राक्षाला वजन नाही. या सर्वांचा परिणाम द्राक्षाच्या बाजारभावावर होणार आहे.- ज्ञानेश्वर शेळके प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, राजुरीखरीप पिकांना वरदान ठरणारी थंडी मात्र इतर पिकांना नुकसानकारक असून, याचा काही पिकांवर दूरगामी परिणाम होणार असून, शेतकºयांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.- संजय भुजबळ, अध्यक्ष, जुन्नर तालुका शेतकरी संघटना

टॅग्स :agricultureशेतीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन