शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Winter Session Maharashtra : पुण्यासह राज्यात थंडीची लाट : अनेक शहरांत पारा १० अंशांच्याही खाली

By श्रीकिशन काळे | Updated: December 16, 2024 10:31 IST

पुण्यातील कमाल तापमानदेखील ३० अंशांच्या आत आले आहे

पुणे : उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारीदेखील राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला. राज्यात नगरला सर्वांत कमी नीचांकी तापमान ६.४ अंशांवर नोंदले गेले, तर पुण्यात रविवारी (दि.१५) एनडीए भागात आठ अंश, तर शिवाजीनगरला ९ अंशांवर तापमान नोंदविले गेले.पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत १० अंश सेल्सिअसखाली तापमान आले आहे. रविवारी (दि.१५) पहाटे एनडीए भागात सर्वांत कमी आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शनिवारपासूनच किमान तापमानात घट झाली होती. त्यामुळे रविवारची सकाळ पुणेकरांसाठी कडाक्याची थंडी होती. तसेच पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहील आणि सकाळी हलकेसे धुके पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला. पुण्यातील कमाल तापमानदेखील ३० अंशांच्या आत आले आहे. पाषाणला २७.८, भोरला २८.५, तर शिवाजीनगरला २९.६ कमाल तापमान नोंदविले गेले.राज्यात थंडीचा कडाका जाणवत असून, अनेक शहरांचे तापमान १० अंशांच्या खाली नोंदविले गेले. राज्यातील नीचांकी किमान तापमान अहिल्यानगरमध्ये ६.४ एवढे नोंदविले गेले. त्यानंतर जळगाव, छ. संभाजीनगर, परभणी, अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे ७ ते ८ अंशांवर तापमान होते.राज्यात येथे थंडीची लाटराज्यात सोमवारी (दि.१६) पुण्यासह जळगाव, नगर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट असेल, असा अंदाज देण्यात आला आहे.पुण्यातील किमान तापमानएनडीए : ८.०माळीण : ९.०दौंड : ९.०शिवाजीनगर : ९.०बारामती : ९.०शिरूर : ९.०पाषाण : ९.३नारायणगाव : ९.७राजगुरूनगर : ९.९इंदापूर : १०.६पुरंदर : १०.६कोरेगाव पार्क : १४.१वडगावशेरी : १५.७मगरपट्टा : १५.९लोणावळा : १६.८ राज्यातील किमान तापमाननगर : ६.४पुणे : ९.०जळगाव : ७.९महाबळेश्वर : १२.५नाशिक : १०.६सातारा : १२.१सोलापूर : १४.०मुंबई : २२.४छ. संभाजीनगर : ८.८परभणी : ८.६अकोला : ९.६गोंदिया : ७.२वर्धा : ७.४

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड