पुणे : महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात झालेल्या अवकाळी पावसामुळे नारळाचा दर्जा प्रचंड घसरला आहे. सध्या मार्केटयार्डमध्ये दाखल होणाऱ्या नारळाला फारसा उठाव नाही, तरी देखील दरामध्ये मात्र वाढ झाली आहे. शेकड्यामागे नारळाच्या दरामध्ये १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.दिवाळीनंतर नारळाची आवक आणि मागणी घटली आहे. त्यातच दजार्ही घसरला आहे. परिणामी दरामध्ये वाढ झाली आहे़ आवकेमध्ये लक्षणीय घट झाल्याने शेकड्यामागे नारळाच्या दरामध्ये १०० ते २०० रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नारळाचा नवीन हंगाम सुरु होण्यास अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे़ मार्केटयार्डात सध्या आवक होणाऱ्या नारळाचा आकार लहान असून समाधानकारक नाही़ तरीही दरामध्ये वाढ झाली आहे़ दिवाळीच्या सणानंतर नारळाला मागणी घटली आहे़. आंध्र प्रदेशात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे़ परिणामी तेथून होणारी आवक घटली आहे़.तसेच तामिळनाडूतून येणाऱ्या नारळाची प्रत मोठ्या प्रमाणात खालावली आहे़. तरीही दर चढेच आहेत़ तसेच कर्नाटक राज्यातूनही आवक लक्षणीय घटल्यामुळे दर चढेच असल्याची माहिती नारळाचे व्यापारी आणि दि़ पुना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष दिपक बोरा यांनी दिली़.सध्या मार्केटयार्डात नारळाची अत्यल्प आवक होत आहे़. दररोज तीन ते पाच गाड्यांची म्हणजेच १ ते दीड हजार पोत्यांची आवक होत आहे़. एका पोत्यामध्ये जवळपास शंभर नारळ असतात़. दिवाळीपूर्वी दररोज तीन हजार पोत्यांची आवक होत होती़. एकंदरीतच ही आवक निम्म्याने घटली आहे़ तसेच मागणीही निम्म्याने घटली आहे़. तरीही भाव वाढ झाली आहे़. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशीच स्थिती राहणार आहे़. डिसेंबरमध्ये दत्तजयंती आाणि नाताळाचा सण असल्याने मागणी चांगली राहील. तसेच नवीन नारळाची आवक महाशिवरात्री दरम्यान म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होईल. तसेच त्यानंतर नारळाचा दर्जाही सुधारणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला़.-- नारळाचे प्रकार आणि दर शेकड्यामध्ये नारळाचा प्रकार शेकड्याचा दरनवा नारळ ९७५ ते १२५० रुपयेपालकोल १४०० ते १५०० रुपयेसापसोल १५०० ते २३०० रुपयेमद्रास २४०० ते २५५० रुपये
अवकाळी पावसाने नारळाचा दर्जा घसरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 19:41 IST
महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात झालेल्या अवकाळी पावसामुळे नारळाचा दर्जा प्रचंड घसरला आहे...
अवकाळी पावसाने नारळाचा दर्जा घसरला
ठळक मुद्देउठाव नाही : मागणी घटली तरी दरामध्ये वाढ