शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त; उंड्री परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

By नितीश गोवंडे | Updated: February 16, 2024 17:41 IST

तब्बल ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे १५२ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त

पुणे: गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या विदेशी नागरिकाला पकडले.  त्याच्या ताब्यातून तब्बल ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे १५२ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. हसेनी मुबीनी मीचॉगा (३५, मु. रा. टांझानिया) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की, एक परदेशी नागरिक कोंढवा परिसरात उंड्री येथे सार्वजनिक रस्त्यावर कोकेन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित परदेशी इसमाला ताब्यात घेतले. आरोपी हा मुळचा टाझांनिया येथील रहिवासी असून कामानिमित्ताने भारतात आला. उंड्री याठिकाणी तो सध्या राहत होता. परंतु अंमली पदार्थ विक्री करताना तो पोलिसांना मिळून आला आहे. पोलिसांनी आरोपीवर कोंढवा पोलिस ठाण्यात एनडीपीसी कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिली.

साडेचार लाखांचे मेफेड्रॉन जप्त...

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके आणि अंमली पदार्थ विरोधी पथक २ हे विश्रांतवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस हवालदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण लोहगाव धानोरी रस्त्यावर मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी किसन नंदकिशोर लधार (३४, रा. लोहगाव, मु. रा. राजस्थान) या आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून चार लाख ४० हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम मेफेड्रॉन व दहा हजाराचा एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडीच लाखांचा गांजा हस्तगत..

वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस गस्त घालताना पोलिस हवालदार रवींद्र रोकडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एम्प्रेस गार्डन गेट समोर घोरपडी येथे सार्वजनिक रस्त्यावर गांजा हा अंमली पदार्थ विक्री करताना ओंकार अनिल चंडालिया (२१, रा. उरळी कांचन) या पकडले. त्याच्या ताब्यातून दोन लाख ४० हजार रुपये किमतीचा ९ किलो गांजा, एक मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा