शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

सह पोलीस आयुक्त डॉ, रवींद्र शिसवे, पोलीस निरीक्षक गजानन पवार, मेधशाम डांगे, उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांना राष्ट्रपती पोलीस पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम ...

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतीचे गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना राष्ट्रपतीचे शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांना गुणवत्तपूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे. सध्या नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले व हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

डॉ. रवींद्र शिसवे हे २००८ च्या बॅचचे आयपीएस आहेत. डॉ. शिसवे यांना यापुर्वी अंतरिक सुरक्षा सेवा पदक आणि हार्डशीप स्पेशल सर्व्हिस पदक मिळाले आहे. त्यांना आतापर्यंतच्या सेवा काळात ५५ बक्षिसे मिळाली आहेत. सेवा काळात अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली अद्ययावत कौशल्य मिळविण्यासाठी डॉ. शिसवे यांनी आतापर्यंत ३ वेळा परदेशात प्रशिक्षण घेतले आहे. त्यांची मे २०१९ मध्ये सह पोलीस आयुक्त म्हणून पदोनन्ती झाली आहे.

........

गजानन पवार

गजानन पवार यांनी आतापर्यंत मुंबई, नागपूर, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि पुणे शहरातील गुन्हे शाखेत उत्कृष्टपणे कर्तव्य बजावले आहे. ते १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत भरती झाले. पोलीस दलात कार्यरत असताना त्यांना आतापर्यंत एकूण ४७५ बक्षीसे मिळाली आहेत. त्यांना २०११ मध्ये पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह आणि २०१९ मध्ये राष्ट्रपतीचे पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यंदा त्यांना राष्ट्रपतीचे शौर्य पदक जाहीर झाले आहे.

........

मेघश्याम डांगे

मेघश्याम डांगे हे १९९२ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. त्यांनी नागपूर, नाशिक ग्रामीण, ठाणे शहर, धुळे, नंदूरबार याठिकाणी सेवा बजावली आहे. ठाणे येथे नेमणुकीस असताना बनावट क्रेडिट कार्ड तयार करून लोकांची फसवणूक करणार्‍या टोळीला त्यांनी अटक केली होती. त्यावेळी आरोपींकडून १ हजार बनावट कार्ड जप्त करण्यात आले होते.

......

शाकीर जिनेडी

शाकीर जिनेडी हे १९८७ मध्ये पोलीस दलात भरती झाले. त्यांची पोलीस दलात ३३ वर्षे सेवा झाली असून त्यांना आतापर्यंत ४६० बक्षीसे मिळाली आहेत. ते उत्कृष्ट ॲथलॅटिक्स खेळाडु असून त्यांना १९८९ मध्ये राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडुचा मान मिळाला होता. २०१७ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. पोलीस सेवेतील कालावधीमध्ये त्यांनी १०० हून अधिक पिस्तुले जप्त केली आहेत.

.............

पोलिस दलात काम करण्यास मिळणे ही खरोखर पुण्याईची गोष्ट आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मला माझे सर्व गुरुस्थानी असलेले वरिष्ठ यांची आवर्जुन आठवण येते. हा पुरस्कार मी माझ्या गुरुस्थानी असलेल्या सर्व वरिष्ठांना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो.

डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलिस आयुक्त पुणे शहर

--------