बिबवेवाडी येथे अज्ञात वाहनाची धडक बसल्याने सीएनजी रिक्षाचा स्फोट, रिक्षाचालक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 16:54 IST2018-12-12T16:49:11+5:302018-12-12T16:54:30+5:30
बिबवेवाडी येथील भारत ज्योती गॅस थांब्याजवळ विरुद्ध दिशेने जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने सीएनजी रिक्षाचा स्फोट झाला.

बिबवेवाडी येथे अज्ञात वाहनाची धडक बसल्याने सीएनजी रिक्षाचा स्फोट, रिक्षाचालक गंभीर जखमी
ठळक मुद्देस्फोटात संबंधित रिक्षा चालक गंभीर जखमी
पुणे : बिबवेवाडी येथील भारत ज्योती गॅस थांब्याजवळ विरुद्ध दिशेने जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने सीएनजी रिक्षाचा स्फोट झाला. अपघातानंतर झालेल्या स्फोटात संबंधित रिक्षा चालक गंभीर भाजला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी विवेकानंद मार्गावरील भारत ज्योती बसस्टॉप समोर विरुध्द दिशेने येणाऱ्या (एमएच. १२. केआर. ४६६८) या रिक्षाचा स्फोट होऊन यामध्ये रिक्षाचालक गंभीररित्या भाजला असून त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले आहे. किशोर नरके (वय २७ रा.पर्वती) रिक्षा चालकांचे नाव आहे.